घरमहाराष्ट्रडॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाचे काम लांबणार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाचे काम लांबणार

Subscribe

जास्त उंचीमुळे कामाची डेडलाईन वर्षाने वाढणार

(इंदु मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाचे काम हे एक वर्षाने लांबणीवर पडणार आहे. या स्मारकाच्या पुतळ्याची उंची वाढल्यानेच आता स्मारकाचे काम पूर्ण होण्यासाठी आणखी वर्षभराचा कालावधी लागणार आहे. प्रकल्पाच्या टाईमलाईननुसार प्रकल्पाचे काम २०२१ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. पण आता यामध्ये आणखी एका वर्षाची भर पडणार आहे. सुधारीत संकल्पनेनुसार नव्याने विस्तृत वास्तूशास्त्रीय आणि अभियांत्रिकी आराखडे तसेच विविध विभागांच्या परवानग्या याचे काम प्रगतीपथावर आहे. त्यामुळेही हा प्रकल्प आणखी वर्षभराने लांबणार आहे.

इंदुमिल येथील ४.४ हेक्टर भूखंडाच्या जागेवर या स्मारकाच्या कामाचे भूमीपूजन ११ ऑक्टोबर २०१५ रोजी करण्यात आले. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीच्या निमित्ताने या प्रकल्पाची संकल्पना पुढे आली. प्रकल्पासाठीचे कार्यादेश शापुरजी पालनजी कंपनी प्रायव्हेट लिमिटेडला ९ फेब्रुवारी २०१८ रोजी देण्यात आले. या प्रकल्पाचा कालावधी हा ३६ महिने असून सुधारीत खर्च १०८९.९५ कोटी रूपये या प्रकल्पासाठीचा खर्च आहे.

- Advertisement -

या प्रकल्पासाठी आवश्यक बांधकामाची संरचनात्मक आराखड्याचे काम पूर्ण झाले आहे. बांधकामाशी आवश्यक सर्व संबंधित परवानग्या प्राप्त झाल्या आहेत. सद्यस्थितीला या प्रकल्पाचे २५ टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे. या प्रकल्पात पायथ्याची उंची वाढवून आता ४५० फूट उंच पुतळा उभारण्यात येणार आहे.

पुतळ्याच्या जागेवर काम नाहीच
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची २५ फुटांची प्रतिकृती तयार झाली आहे. पण प्रत्यक्ष पुतळ्याच्या ठिकाणी खोदकामाला सुरूवात झालेली नाही. पुतळ्याची उंची वाढण्याचा निर्णय प्रलंबित असल्यानेच या जागेवर काम सुरू झाले नाही. पुतळ्याची जागा सोडून उर्वरीत ठिकाणी मात्र कामाला सुरूवात झाली आहे. आता वाढीव उंचीसाठी आणखी मोठा पाया तयार करून पुतळ्याच्या जागेचे काम सुरू होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -