ST Workers Protest: पवारांच्या घरावरील हल्ल्यावर गुणरत्न सदावर्तेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन हल्लाबोल केला. यावेळी संपकरी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्याविरोधात आक्रमक घोषणाबाजी केली. या हल्ल्याबाबत मला काहीही माहिती नाहीये. मी व्यक्तिगत आयुष्यात कधीही खोटं बोलत नाही आणि समाजामध्ये सुद्धा कधीही खोटं वागत नाही. हे सर्व प्रकरण मी कोर्टामध्ये ११८ अधिकाऱ्यांची केस सुरू असताना झालं. त्यामुळे या हल्ल्याबाबत मला काहीही माहिती नाही, असं अॅड. गुणरत्न सदावर्ते म्हणाले.

या हल्ल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या चर्चा करण्यास तयार आहेत, असं त्या म्हणाल्या. हे भारतीय हिंदुस्तानी नागरिक असून जय श्री राम बोलणारे नागरिक आहेत. या नागरिकांना तुम्ही सीमा पार राहत असलेल्या माणसांसारखं ट्रीट करू नये. या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, त्यानंतर जे निष्पन्न होईल त्यावर बोलावं, असं अॅड. गुणरत्न सदावर्ते म्हणाले.

कर्मचाऱ्यांना चिथावण्याचा प्रयत्न ?

संविधानिक मर्यादा आम्ही कधीही ओलांडलेली नाही. त्यांचे स्वत:चे अधिकारी असतील किंवा महाराष्ट्रातील तमाम अधिकारी असतील त्यांना माहितेय की, आम्ही संविधानाच्या बाहेर एकही शब्द बोललेलो नाही. हा सर्व प्रकार ड्राम्याचं असेल तर त्याला हल्ल्याचं स्वरूप सरकारला देऊ नये. १२४ महिलांचं कुंकू पुसलं गेलं आहे. ३५० कोविडमध्ये विधवा झालेल्या वीर भगिनी आणि कोविडमध्ये काम करताना व्यथित झालेल्या विधवा भगिनी यांच्या प्रती अशा प्रकारे हल्लेखोर ठरू नका. पहिल्यांदा या हल्ल्याची चौकशी करा. आम्ही कोणत्याही हल्ल्याचे समर्थन करू शकत नाही. कष्टकऱ्यांसाठी लढणं चुकीचं आहे का, असा सवाल देखील गुणरत्न सदावर्ते यांनी विचारला आहे.


हेही वाचा : ST workers on silver Oak : शरद पवारांच्या सिल्व्हर ओकवर हल्ला हे पोलीस गुप्तचर यंत्रणेच अपयश