(Dr. Manmohan Singh) मुंबई : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी भारतीय अर्थव्यवस्थेचे उदारीकरण केले. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासगीकरण केले. त्यामुळे मोदी सरकारने डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर राग धरून त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी दोन मीटर जमीन नाकारली. मुंबई, दिल्लीतील जमिनी आता प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्या ताब्यात आहेत. त्यामुळे डॉ. मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्कारासाठी हव्या असलेल्या जमिनीसाठी काँगेसने अदानी यांच्याकडे विनंती अर्ज करायला हवा होता काय? असा खोचक प्रश्न ठाकरे गटाने केला आहे. (Thackeray group taunts Modi government by referring to Adani)
डॉ. मनमोहन सिंग यांनी देशात उदारीकरण आणले. भारताचे दरवाजे जागतिक गुंतवणूकदारांसाठी खुले केले. त्यामुळे मध्यमवर्गीयांच्या हातातही पैसा खेळू लागला. हे काम त्यांनी धाडसाने केले. मोदी यांना उदारीकरण आणि खासगीकरण यातला फरक समजला नाही. त्यांनी विमान कंपन्या, विमानतळ, बंदरे, तेल कंपन्यांचे खासगीकरण करून सर्व संपत्ती त्यांचा मित्र गौतम अदानी यांना सोपवली, अशी घणाघाती टीका ठाकरे गटाने केली आहे.
हेही वाचा – SS UBT Vs NDA Govt : हिंदुस्थान हा मोदी-शहा सरकारच्या बापजाद्यांची कमाई नाही, ठाकरे गटाचा संताप
डॉ. मनमोहन सिंग यांनी अखंड देशसेवा केली. ते दहा वर्षे पंतप्रधानपदी होते. या दहा वर्षांत त्यांनी देशाला आर्थिक अराजकातून बाहेर काढले आणि मध्यमवर्गीयांना अच्छे दिन दाखवले. ‘maker of post – modern India’ असा उल्लेख मनमोहन सिंग यांच्याबाबत करण्यात येत आहे. त्याचा अर्थ मनमोहन सिंग यांना अंत्यसंस्कारासाठी जागा नाकारणाऱ्यांनी समजून घेतला पाहिजे, असा टोलाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सामना दैनिकातील अग्रलेखाच्या माध्यमातून लगावला आहे.
अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन 16 ऑगस्ट 2018 रोजी झाले. तेव्हा पंतप्रधान मोदी होते. अटलजी यांचे अंत्यसंस्कार राष्ट्रीय स्मृतिस्थळावर झाले. जेथे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांचे अंतिम संस्कार होतात आणि ही जागा त्यासाठी राखीव आहे. येथे अटलबिहारी वाजपेयी यांचे अंत्यसंस्कार झाले आणि त्यांच्या समाधी स्थळासाठी सात एकर जमीन देण्यात आली, पण डॉ. मनमोहन सिंग यांना मात्र त्याच स्थळी दोन मीटर जमीन नाकारली. हा कृतघ्नपणा आहे, असा हल्लाबोल ठाकरे गटाने केला आहे. (Dr. Manmohan Singh : Thackeray group taunts Modi government by referring to Adani)
हेही वाचा – NRI Voting : लोकसभेतील मतदानाबाबत अनिवासी भारतीय उदासीन, महाराष्ट्राची आकडेवारी काय सांगते?