घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अनेक कडक निर्बंध; हे आहेत नवीन नियम

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अनेक कडक निर्बंध; हे आहेत नवीन नियम

Subscribe

औरंगाबाद : डाॅ. बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठ परिसराच्या सुरक्षेसंदर्भात नुकतीच सुरक्षा समितीची बैठक पार पडली. या बैठकीत विद्यापीठ कॅम्पसच्या सुरक्षेबाबत अत्यंत महत्वपूर्ण आणि कडक नियम तयार करण्यात आले. त्यात मुख्यत्वे १८ निर्णय घेण्यात आले आहेत. वाहनांची वेग मर्यादा ते अगदी आंदोलने, मोर्चे यांबाबत हे निर्णय आहेत.

समिती अध्यक्ष कुलसचिव भगवान साखळे, सचिव उपकुलसचिव विष्णू कऱ्हाळे, कार्यकारी अभियंता आर. डी. काळे, डॉ. मुस्तजीब खान, डाॅ. कैलास पाथ्रीकर, डाॅ. पुरषोत्तम देशमुख व सुरक्षा अधिकारी उपस्थित होते. प्रशासकीय इमारतीसमोर आंदोलनास पूर्वपरवानगी लागेल. उपोषण, मोर्चे आंदोलनाला पोलिसांची परवानगी बंधनकारक राहील. कुलगुरू कार्यालयात आंदोलकांना परवानगीशिवाय प्रवेश मिळणार नाही, असे ठरले. आंदोलनांच्या परवानगीसाठी कुलसचिवांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. परिसरातील फुले तोडण्यास मनाई करण्यात आली. मोकाट जनावरांचा बंदोबस्त. विद्यापीठ प्रवेशद्वारापासून ते विधी विभागापर्यंत मुख्य रस्त्यावर गरजेनुसार गतिरोधक, बारा ठिकाणी सीसीटीव्हीची व्यवस्था करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला तसेच विद्यापीठात वाहनांची वेगमर्यादा २० किमी प्रति तासावर नसेल, याकडे सुरक्षा रक्षकांनी लक्ष द्यावे.प्रतिबंधित क्षेत्रात विनापरवानगी फोटो, व्हिडीओ शूटिंग केल्यास २ हजार रु. दंड आणि विद्यापीठ परिसरात वाहन शिकवण्यासाठी दुचाकी, चारचाकी आढळून आल्यास ३ हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. नियमांच्या अंमलबजावणीला सोमवारपासून सुरुवात झाल्याचे कुलसचिव डाॅ. भगवान साखळे यांनी सांगितले.

असे असतील निर्बंध
  • वाहनांची वेगमर्यादा २० किमी प्रति तास राहील याकडे लक्ष देणे
  • हाॅर्न प्रतिबंध, धूम्रपानावर बंदी पालनाकडे लक्ष देणे, फलक लावणे
  • विनापरवानगी फोटो, व्हिडीओ शूटिंग २ हजार दंड
  • अनुचित प्रकार, दुर्घटना, मदतीवेळी संपर्कासाठी सुरक्षा रक्षकांचा संपर्क क्रमांक फलक लावणे
  • परिसरात वाहन चालवणे शिकण्यास प्रतिबंध, ३ हजार दंड
  • स्नेक कॅचरची व्यवस्था व सर्पमित्रांचे संपर्क क्रमांक दर्शनी ठिकाणी लावणे
  • कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी, सुरक्षारक्षकांना बायोमॅट्रिक हजेरी, ड्रेसकोड, ओळखपत्र बंधनकारक
  • सकाळी ६ ते ९ पायी चालणाऱ्यांच्या सुरक्षेसाठी वाहनांना विद्यापीठ गेटवर डाव्या बाजूने वाहनतळ करणे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -