घरताज्या घडामोडीडॉ. प्रकाश आमटे यांना डिस्चार्ज, कर्करोगावरील उपचाराबाबत दिली महत्त्वाची माहिती

डॉ. प्रकाश आमटे यांना डिस्चार्ज, कर्करोगावरील उपचाराबाबत दिली महत्त्वाची माहिती

Subscribe

पुढील दोन तीन दिवसांत काही तपासण्या करून केमोथेरीबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचं प्रकाश आमटे यांचे पुत्र अनिकेत आमटे यांनी फेसबूक पोस्टद्वारे सांगितलं.

सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. १३ जून रोजी त्यांना प्रकृती अस्वस्थामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच, पुढील दोन तीन दिवसांत काही तपासण्या करून केमोथेरीबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचं प्रकाश आमटे यांचे पुत्र अनिकेत आमटे यांनी फेसबूक पोस्टद्वारे सांगितलं. (Dr. Prakash Amte discharge from hopital, given important information about blood cancer)

बी. जे वैद्यकीय महाविद्यालयातील दीक्षांत समारंभासाठी डॉ. प्रकाश आमटे गेले होते. मात्र, तेथे त्यांनी अस्वस्थ वाटू लागलं. ताप आणि खोकला अशी लक्षणं आढळल्याने त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर न्युमोनियावर उपचार सुरू असतानाच काही चाचण्यांमधून त्यांना प्राथमिक अवस्थेतील रक्ताचा कर्करोग असल्याचं निष्पन्न झालं. दरम्यान प्रकाश आमटे यांना सध्या बरे वाटले असून तात्पुरता डिस्चार्ज मिळाल असल्याची माहिती अनिकेत आमटे यांनी दिली.

- Advertisement -

हेही वाचा – ज्‍येष्‍ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे पुण्यातील रुग्णालयात दाखल

फेसबूक पोस्टद्वारे अनिकेत आमटे म्हणाले की, “बाबांची तब्येत आज बरी आहे. आज सध्या पुरता डिस्चार्ज मिळाला आहे. दोन तीन दिवसांनी तपासणी (चेक अप) होईल. परत रक्ताच्या सर्व टेस्ट करतील आणि ब्लड व्हॅल्यूज ठीक असल्यास लवकरच (आठ ते दहा दिवसांत) केमोथेरपी सुरू करतील. पुढील साधारण महिनाभर ट्रीटमेंट पुण्यातच होणार आहे. बाबांचा आजचा फोटो सोबत जोडला आहे रुमानी सोबतचा. पेशंट कसा असावा याचे आयडीयल उदाहरण आहेत बाबा. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये अतिशय आपुलकीने ट्रीटमेंट करणारे डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ, मामा मावश्या सर्वांचे आभार.” असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे. आपण सर्वांच्या शुभेच्छा धीर द्यायला सोबत आहेतच.

- Advertisement -

हेही वाचा – डॉ. प्रकाश आमटे यांना बिल गेट्सच्या हस्ते गौरवान्वित

वडिलांच्या तब्येतीविषयी माहिती सांगताना त्यांनी लोक बिरादरीमध्ये इयत्ता दहावीत शिकणाऱ्या मुलांचा निकालही सांगितला आहे. लोक बिरादरीचा निकाल ८३ टक्के लागल्याचंही त्यांनी सांगितलं. ते म्हणाले की, “आनंदाची बातमी, लोक बिरादरी आश्रमशाळा मधून मार्च २०२२ ची दहावी पास झालेले प्रथम पाच विद्यार्थी पुढील प्रमाणे आहेत. १) प्रथम क्रमांक : – अनिकेत झुरू पुंगाटी, प्राप्त गुण ५०० पैकी ४०४ टक्केवारी ८०.८०% २) द्वितीय क्रमांक :-रोहित रमेश दुर्वा, प्राप्त गुण ५०० पैकी ३९९, टक्केवारी ७९.८० % ३) तृतीय क्रमांक: – महेश अमलू काळंगा, प्राप्त गुण ५०० पैकी ३९०, टक्केवारी ७८% ४) चतुर्थ क्रमांक :–कुमारी अरुणा प्रमोद परसा प्राप्त गुण ५०० पैकी ३७८, टक्केवारी ७५.६० % ५) पाचवा क्रमांक:- कुमारी साक्षी संजय वेलादी प्राप्त गुण ५०० पैकी ३६१, टक्केवारी ७२.२० % एकूण निकाल ८३ टक्के लागला आहे. कॉपी मुक्त निकाल आहे. त्यामुळे ज्यांनी अभ्यास केला ती पास झालीत. सर्व पास झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी निराश न होता चांगला अभ्यास करून पुढील परीक्षेत यश संपादन करावे या साठी शुभेच्छा,” असं पोस्टमध्ये म्हटलंय.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -