घरताज्या घडामोडीडॉ. भारमल यांना नायरच्या अधिष्ठाता पदावरून केलं मुक्त

डॉ. भारमल यांना नायरच्या अधिष्ठाता पदावरून केलं मुक्त

Subscribe

शीव रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी आता नायरमध्ये

महाभयंकर अशा कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये आरोग्य यंत्रणा कामाला जुंपलेली असतानाच नायर रुग्णालयाच्या अधिष्ठाता पदापासून डॉ. रमेश भारमल यांना मुक्त करण्यात आलं आहे. डॉ. भारमल यांना नायर रुग्णालयाच्या अधिष्ठाता पदासह तिन्ही वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालयांच्या संचालक पदाची संयुक्त जबाबदारी सोपवण्यात आली होती. परंतु अधिष्ठाता पदापासून त्यांना दूर करत त्या जागी शीव रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी दोन दिवसांपूर्वी कार्यालयीन आदेश बजावत डॉ. रमेश भारमल यांच्याकडे केवळ वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालयाचे संचालक पद कायम ठेवण्यात आलं आहे. तर नायर रुग्णालयातील अधिष्ठाता या रिक्त पदावर शीव येथील लोकमान्य टिळक महापालिका सर्वसाधारण रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांची वर्णी लावली आहे. डॉ. मोहन जोशी यांच्याकडे शीव रुग्णालयाबरोबरच सध्या सेव्हन हिल्स रुग्णालयाची प्रभारी जबाबदारी होती.

- Advertisement -

हेही वाचा – मुंबई-पुण्यातली परिस्थिती गंभीर; केंद्रीय गृह विभागानं व्यक्त केली चिंता!


दरम्यान, मोहन जोशी यांची बदली नायरला करतानाच शीव आणि सेव्हन हिल्स रुग्णालयातील पद रिक्त ठेवण्यात आले आहे. वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालयांचे संचालक पद हे स्वतंत्र अस्तित्वात नसल्याने डॉ. भारमल यांच्याकडे अन्य कार्यभार सोपवण्याचे आदेश यथावकाश देण्यात येतील, असे आयुक्तांनी आपल्या आदेशात म्हटले आहेत.

- Advertisement -

नायर रुग्णालयात एमआरआय मशिन युनिटमुळे अपघात होवून राजेश मारु या तरुणाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर एका डॉक्टरने रॅगिंगप्रकरणी आत्महत्या केली होती. या दोन्ही घटनांनंतर डॉ. भारमल यांच्याकडे संचालक पद सोपवण्यात आले होते. भारमल यांना संचालक पद देण्यास लोकप्रतिनिधींचा विरोध असतानाही आयुक्तांनी त्यांना संचालक पदावर बसवले होते.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -