Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर ठाणे मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तपदी डॉ.रवींद्र शिसवे

मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तपदी डॉ.रवींद्र शिसवे

Subscribe

कल्याण । कल्याण तालुक्यातील आपटी गावचे आयपीएस झालेले डॉक्टर रवींद्र शिसवे यांची मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त म्हणून नेमणूक झाल्याने कल्याण तालुक्यातील ग्रामस्थांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. मुंबई रेल्वे मुख्यालयात त्यांनी शनिवारी त्यांनी पदभार स्वीकारला. शुक्रवारी त्यांच्या बदलीचे आदेश राज्याच्या गृहविभागाने काढले होते. याआधी ते मानवी हक्क आयोग येथे विशेष पोलीस महानिरीक्षक पदावर काम करत होते.

ठाणे जिल्हा परिषद शाळेतून डॉक्टर शिसवे यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले होते. वैद्यकीय क्षेत्रातील एमबीबीएस पदवी घेतल्यानंतर त्यांची नियुक्ती शहापूर तालुक्यातील डोळखांब येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात झाली होती. काही काळ सेवा बजावल्यानंतर त्यांची यूपीएससी परिक्षेतून भारतीय पोलीस सेवेसाठी निवड झाली. सांगली बुलढाणा आणि कोकण या परिक्षेत्रात पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी कामगिरी बजावली होती. कोरोनाच्या काळात त्यांनी पुणे येथे सह आयुक्त म्हणून उल्लेखनीय कामगिरी बजावल्याने त्यांचा विविध पुरस्कार देऊन सत्कारही करण्यात आला होता. पुणे येथून त्यांची विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग मुंबई येथे बदली करण्यात आली होती. प्रशासकीय कर्तव्यात अत्यंत कर्तव्यनिष्ठ आणि निष्कलंक अधिकारी म्हणून डॉक्टर शिशवे यांच्याकडे बघितले जाते. नुकतीच त्यांची बदली मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तपदी झाली आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -