Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी डॉ. शिवराज मानसपुरे मध्य रेल्वेचे नवे मुख्य जनसंपर्क अधिकारी

डॉ. शिवराज मानसपुरे मध्य रेल्वेचे नवे मुख्य जनसंपर्क अधिकारी

Subscribe

डॉ. शिवराज मानसपुरे यांनी मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून आज पदभार स्वीकारला, डॉ. शिवराज मानसपुरे हे MBBS, MD (शरीरशास्त्र) भारतीय रेल्वे वाहतूक सेवा (IRTS) 2011 बॅचचे अधिकारी आहेत.

डॉ. शिवराज मानसपुरे यांनी मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून आज पदभार स्वीकारला, डॉ. शिवराज मानसपुरे हे MBBS, MD (शरीरशास्त्र) भारतीय रेल्वे वाहतूक सेवा (IRTS) 2011 बॅचचे अधिकारी आहेत. रेल्वे बोर्डात माहिती आणि प्रसिद्धी संचालक म्हणून रुजू झालेल्या शिवाजी सुतार यांच्यानंतर त्यांनी पदग्रहण केले आहे. (Dr Shivraj Manaspure is the new Chief Public Relations Officer of Central Railway)

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी डॉ. शिवराज मानसपुरे हे मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. डॉ. शिवराज मानसपुरे यांनी मध्य रेल्वेवर विभागीय परीचालन व्यवस्थापक, सोलापूर विभाग, उपमुख्य परीचालन व्यवस्थापक, निर्माण विभाग, मुंबई आणि वरिष्ठ विभागीय परीचालन व्यवस्थापक, मुंबई विभाग यासारख्या विविध पदांवर काम केले आहे.

- Advertisement -

‘या’ पुरस्कारांनी सन्मानित

  • सोलापूर विभागातील उत्कृष्ट ट्रेन परीचालन कामगिरीबद्दल त्यांना 2016 मध्ये महाव्यवस्थापक श्रेत्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
  • 2019-20 मध्ये मुंबई विभागातील लोकल उपनगरी गाड्या आणि मेल एक्स्प्रेस गाड्यांच्या उत्कृष्ट ट्रेन परीचालानासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट वक्तशीरता क्षेत्रीय शिल्ड देखील मिळाली आहे.
  • मुंबई विभागावर उपनगरीय सेवा, मेल/एक्स्प्रेस गाड्या चालवण्यासाठी मुंबई विभागाची गुणवत्ता सुधारण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

डॉ. शिवराज मानसपुरे यांनी उपनगरीय वेळापत्रकाच्या एकत्रिकरणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यामुळे अतिरिक्त उपनगरीय सेवांसाठी मार्ग तयार झाले. ठाणे-दिवा नवीन 5वे आणि 6वे रेल्वे मार्ग पूर्ण करताना या नवीन रेल्वे मार्गांच्या बांधकामासाठी विविध मेंटेनन्स ब्लॉक्सची व्यवस्था करणे आणि त्याच वेळी सुमारे 180 दिवस ब्लॉक कालावधीत उपनगरीय गाड्या चालू ठेवणे या कामात त्यांचा मोलाचा वाटा होता.


- Advertisement -

हेही वाचा – कोकणवासीयांसाठी खुशखबर! कोकण रेल्वेमार्गावरील वंदे भारत एक्स्प्रेसची चाचणी यशस्वी, ७ तासांत प्रवास शक्य

- Advertisment -