घरमहाराष्ट्रवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. इंद्र मणी 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. इंद्र मणी 

Subscribe

डॉ. इंद्र मणी यांनी भारतीय कृषी संशोधन संस्था नवी दिल्ली येथून कृषी अभियांत्रिकी या विषयात एमएससी व पीएचडी प्राप्त केली असून, त्यांना अध्यापन, संशोधन, प्रशासकीय कार्य आणि कृषी विस्तार सेवेचा व्यापक अनुभव आहे

भारतीय कृषी संशोधन संस्था दिल्ली येथील संशोधन सहसंचालक प्रा. इंद्र मणी यांची परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी गुरुवारी (दि.१४) डॉ. इंद्र मणी यांची नियुक्ती जाहीर केली.

कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांचा कार्यकाळ ६ मे  २०२२ संपल्यामुळे विद्यापीठाचे कुलगुरुपद रिक्त झाले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांचेकडे सदर पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. डॉ. इंद्र मणी यांनी भारतीय कृषी संशोधन संस्था नवी दिल्ली येथून कृषी अभियांत्रिकी या विषयात एमएससी व पीएचडी प्राप्त केली असून, त्यांना अध्यापन, संशोधन, प्रशासकीय कार्य आणि कृषी विस्तार सेवेचा व्यापक अनुभव आहे.

- Advertisement -

कुलगुरू नियुक्तीसाठी राज्यपालांनी प्रा. जगमोहन सिंह राजपूत, निवृत्त महासंचालक, एनसीईआरटी यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत केली होती. भारतीय कृषी संशोधन संस्थेचे संचालक डॉ. ए. के. सिंह व राज्याच्या कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवळे हे सदर समितीचे सदस्य होते. समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी डॉ इंद्र मणी यांच्या निवडीची घोषणा केली.


हेही वाचाः लग्नाच्या अफवेनंतर ललित मोदींनी केला खुलासा, म्हणाले सुश्मिता सेनसोबत…

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -