घरताज्या घडामोडीराष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुंब्र्यात प्रथमच महाचित्रकला स्पर्धा, 2 हजार 178 विद्यार्थ्यांचा सहभाग

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुंब्र्यात प्रथमच महाचित्रकला स्पर्धा, 2 हजार 178 विद्यार्थ्यांचा सहभाग

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी गृहनिर्माण आणि अल्पसंख्यांक मंत्री डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली मर्जिया शानू पठाण यांच्या वतीने मुंब्रा येथे महाचित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सुमारे 2 हजार 178 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला. या स्पर्धेतील विजेत्यांना मोठ्या प्रमाणात बक्षिसे देण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कौसा येथील डायमंड हाॅलमध्ये ही स्पर्धा आयोजित केली होती. चार गटांमध्ये ही स्पर्धा संपन्न झाली आहे. या स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना वयोगटानुसार छत्रपती शिवाजीमहाराज, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, मौलाना अबूल कलाम आझाद, अश्फाक खान यांचे पोर्ट्रेट निसर्गचित्र, माय मुंब्रा आदी विषय देण्यात आले होते.

- Advertisement -

या स्पर्धेतील प्रत्येक गटांच्या विजेत्यांस प्रथम क्रमांकास सायकल आणि 3 हजार रूपया द्वितीय क्रमांकास 3 हजार 300; तृतीय क्रमांकास 2100 रूपये आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. तसेच या स्पर्धेतून 40 सुपर मुंब्रा निवडण्यात येणार असून त्यांना 1100 रूपये आणि सन्मानचिन्हाने गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेतील सर्व सहभागी स्पर्धकांना पदक आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

- Advertisement -

यावेळी मर्जिया पठाण यांनी, मुंब्रा येथील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद लाभला असून येत्या 13 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता माजी मंत्री आ. डाॅ.जितेंद्र आव्हाड, सय्यद अली अश्रफ, मा. विरोधीपक्ष नेते शानू पठाण, यांच्या उपस्थितीत डायमंड हाॅलमध्ये पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे, असे सांगितले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शानू पठाण, शाकीर शेख, साकिब दाते , मैसर शेख , नाजीम बुबेरे यांचे सहकार्य लाभले, असेही मर्जिया पठाण यांनी सांगितले.


हेही वाचा : चीनबाबत पंतप्रधानांकडून दिशाभूल, शरद पवारांचा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -