घरक्रीडाHoney Trapped: अजून एक गुप्तचर विभाग अधिकाऱ्याला ATSने घेतले ताब्यात

Honey Trapped: अजून एक गुप्तचर विभाग अधिकाऱ्याला ATSने घेतले ताब्यात

Subscribe

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र एटीएसने कुरूलकरांना पाकिस्तानी महिला एजंटला गोपनीय माहिती देण्याच्या आरोपाखाली अटक केले होते. यानंतर कुरूलकरच्या फोन कॉलच्या यादीत एका गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्याचे नाव पुढे येत आहेत.

मुंबई | हनी ट्रॅपमध्ये (Honey Trap) सापडल्याचे डीआरडीओचे संचालक डॉ. प्रदीप कुरूलकर (Dr. Pradeep Kurulkar) यांना १५ मेपर्यंत विशेष न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. एटीएसने (ATS) केलेल्या तपासात कुरूलकरने ब्रह्मोस, उपग्रहरोधी आणि अग्नी क्षेपपमास्त्रांची माहिती पाकिस्तानला (Pakistan) पुरवल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी तपास करणाऱ्या एटीएसला कुरूलकरच्या फोन कॉल यादीतील आणखी एका गुप्तचर विभागातील अधिकाऱ्यांचे नाव पुढे आले आहे.

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र एटीएसने कुरूलकरांना पाकिस्तानी महिला एजंटला गोपनीय माहिती देण्याच्या आरोपाखाली अटक केले होते. यानंतर कुरूलकरच्या फोन कॉलच्या यादीत एका गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्याचे नाव पुढे येत आहेत. एटीएसने त्या संबंधित गुप्तचर विभागातील अधिकाऱ्यांचा मोबाईल देखील जप्त केला असून या अधिकाऱ्याने गोपनीय कागदपत्रे दिली का? याबद्दल एटीएस तपास करत आहे.

- Advertisement -

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर महिलांची छायाचित्रे वापरून कुरूलकरांना पाकिस्तानने आपल्या जाळ्यात ओढले. यानंतर तो पाकिस्तानातील गुप्तचर अधिकाऱ्यांच्या संपर्कात आला. ते गेल्या सहा महिन्यांपासून पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थांच्या संपर्कात होते, अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.

हेही वाचा – honey trapped: डॉ. प्रदीप कुरुलकर ईमेलद्वारे पाकिस्तानच्या संपर्कात; एटीएसची कोर्टात माहिती

- Advertisement -

कुरूलकर पाकिस्तान गुप्तचर संस्थेतील एका महिलेच्या संपर्कात देखील होते, अशी माहिती समोर आली आहे. त्यानंतर त्यांनी व्हॉट्सअप मेसेज, व्हॉट्सअप कॉलिंग आणि व्हॉट्सअपच्या व्हिडीओ कॉलिंगच्या माध्यमातून पाकिस्तानच्या गुप्तचर अधिकाऱ्यांना माहिती पुरवली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. फेब्रुवारी महिन्यापासून डीआरडीओच्या दक्षता विभागाकडून आणि गुप्तचर पथकांकडून डॉ. कुरूलकर यांच्यावर नजर ठेवून होते. अखेरीस याबाबतची संपूर्ण माहिती पुराव्यानिशी मिळाल्यानंतर आणि DRDO मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर ATSने अधिकृत गुप्त कायद्यांतर्गत आरोपी कुरूलकर यांना अटक केली.

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -