पुणे : पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे. जॉब इंडस्ट्रीदेखील मोठ्या प्रमाणात पुण्यात आहे. त्यासह होलसेल मार्केटचं शहर म्हणून पुण्याला ओळखलं जाते. महाराष्ट्रातून अनेक लोक होलसेल खरेदीसाठी पुण्यात येतात. अनेक ऑफर्सही दुकानदारांकडून दिल्या जातात. अशीच एक ऑफर्स 26 जानेवारीनिमित्त देण्यात आली होती. मात्र, ही ऑफर देणे दुकानदाराला महाग पडल्याचं दिसत आहे.
पुण्यातील राजगुरूनगर येथे केवळ 1 रुपयात ड्रेसची ऑफर एका दुकानदारानं दिली होती. या ऑफरनंतर दुकानाबाहेर ग्राहकांनी एकच गर्दी केली. परंतु, एवढी गर्दी झाली की शेवटी दुकानदाराला दुकान बंद करण्याची वेळ आली.
हेही वाचा : धाराशिवमध्ये ऑपरेशन ‘टायगर’, ठाकरेंचे खासदार अन् आमदार शिंदे सेनेच्या वाटेवर?
नेमकं घडले काय?
प्रजासत्ताक दिनानिमित्त एका कापड दुकानदाराने 1 रुपयात 1 ड्रेस, अशी ऑफर महिलांसाठी ठेवली होती. ही ऑफर सोशल मीडियाच्या माध्यमातून घराघरात पोहोचली. यानंतर ऑफरचा फायदा घेण्यासाठी महिलांची राजगुरूनगरमध्ये एकच झुंबड उडाली.
परिणामी राजगुरूनगर आणि भीमाशंकर मार्गावर महिलांची एकच गर्दी झाली. अनपेक्षित गर्दी झाल्याचे पाहून दुकानदाराने दुकान बंद करण्याचा निर्णय घेतला. परिणामी या मार्गावर मोठा कोंडी झाल्याचं पाहायला मिळाले. दुकानदाराने 1 रुपयात कपडे न दिल्यास दुकान तोडून कपडे घेणार, अशी आक्रमक भूमिका महिलांनी घेतली.
रस्त्यावरील गर्दी वाहतुकीची कोंडी झाल्याने 1 रुपयात ड्रेसची ऑफर पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचली. अखेर खेड पोलीस ठाण्याचे कर्मचारी दुकानापशी दाखल झाले. कर्मचाऱ्यांनी महिला आणि दुकानदार यांच्यात हस्तक्षेप करत वाद संपुष्टात आणला.
हेही वाचा : पुण्यात ‘NCP’च्या नेत्यानं एका व्यक्तीला उचलून आपटले, अजितदादा संतापले; थेट फोन केला, पण…