आमदारांच्या चालकांना विशेष प्रशिक्षण मिळणार, मेटेंच्या निधनानंतर राज्य सरकारचा निर्णय

Deputy Chief Minister a devendra fadanvis big announcement 7 thousand more police recruitment in Maharashtra

मुंबई – शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष आणि मराठा समाजाचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांचं अपघाती निधन झाल्याने राज्यभर हळहळ व्यक्त करण्यात आली. मराठा समाजाच्या बैठकीसाठी मुंबईत येत असताना हा अपघात झाला. याप्रकरणी आता सखोल चौकशी सुरू असून अपघाताचा सर्व रोख चालकावर येत आहे. त्यामुळे राज्यातील नेत्यांचे अपघात रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यातील आमदारांच्या वाहन चालकांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. २४ ऑगस्ट रोजी वाहन चालकांना मुंबईत हे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याच माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या पावसाळी अधिवेशनात दिली. (Drivers of MLAs will get special training, state government’s decision after the death of Mete)

हेही वाचा – …मग मुख्यमंत्रीही जनतेतून करा ना, अजितदादांची विधानसभेत टोलेबाजी

विनायक मेटे यांचा अपघात झाल्यानंतर त्यांच्या चालकाने ११२ क्रमांकावर फोन केला. मात्र, चुकीच्या लोकेशनमुळे विनायक मेटेंना तत्काळ मदत मिळाली नाही. गोल्डन अव्हरमध्ये उपचार न मिळाल्याने विनायक मेटे यांचा मृत्यू झाला. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

मुंबईतील व्हाय.बी.चव्हाण सेंटरमध्ये २४ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत हे प्रशिक्षण होणार आहे. या प्रशिक्षणात अपघातावेळी खबरदारीचा उपाय म्हणून काय करता येईल याबाबत ट्रेनिंग देण्यात येणार आहे. तसंच, ११२ नंबरवर कॉल केल्यानंतर लोकेशन दिसत नव्हते. मात्र, आता या क्रमांकावर फोन केल्यानंतर लोकेशन दिसण्याची तरतूद करण्यात येणार आहे. जेणेकरून कोठेही अपघात घडला तर पोलिसांना तत्काळ घटनास्थळी दाखल होता येणार आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हेही वाचा – संजय राऊतांच्या लेखणीत नेमकं दडलंय काय? स्वतःवरच लिहित असलेल्या पुस्तकातून कोणता गौप्यस्फोट करणार?

आतापर्यंत अनेक नेत्यांचा अपघात झाला आहे. या अपघातात अनेक नेत्यांनी प्राण गमावले आहेत. गोपिनाथ मुंडेंचेही अपघाती निधन झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हळहळला होता. राज्यातील नेत्यांचा अपघात होऊ नये आणि अपघात घडलाच तर गोल्डन अव्हरमध्ये उपचार मिळावे याकरता काय उपाययोजना कराव्यात याचे चालकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.