घरठाणेठाण्यात गारव्याची झुळूक, पारा उतरला १६.२ अंशावर

ठाण्यात गारव्याची झुळूक, पारा उतरला १६.२ अंशावर

Subscribe

दिवसाही वातावरणात गारवा

ठाणे: गेल्या तीन दिवसांपासून ठाणे शहरात गारव्याची जणू झुळूक सर्वत्र पसरल्याने ठाणेकर नागरिक गारटल्याचे दिसत आहेत. यामुळे दिवसाचे ही वातावरण थंड असल्याने थंडी वाढली की काय अशीच चर्चा आता जोर धरू लागली. त्यातच आता ठाणे शहरातील पारा हा १६.२ अंश इतक्या खाली घसरल्याचे दिसत आहे. शुक्रवारपासूनच ठाणे शहरात वाहणारे वाऱ्यांमध्येही गारवा प्रखरतेने जाणवू लागला आहे. अचानक वातावरणात पसरलेल्या गारव्याने दिवसाही थंड वातावरण जाणवत आहे. थंडीकडे दरवर्षीप्रमाणे वाट पाहून बसणाऱ्या ठाणेकर नागरिक या गारव्याने आनंदी झाले आहे.

अजून शहरात शेकोटी जरी पेटलेल्या दिसत नसल्या तरी स्वेटर, कानटोपी, मफल- हात मोजे घालून ठाणेकर बाहेर फिरताना दिसत आहे. रात्र असो या दिवसा वाहणाऱ्या हवेत थंडावा असल्याने थंडी वाढल्याची चर्चा सर्वत्र होऊ लागली आहे. शनिवारी रात्री साडेआठ ते साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पारा २०.४ अंश सेल्सिअस होता. तो पारा हळूहळू घसरत खाली येत होता. रविवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास १६.२ अंश सेल्सिअस वर पारा खाली आला होता. मात्र तो पार त्यानंतर म्हणजे सूर्यनारायणाच्या दर्शनानंतर वाढून दुपारी अडीच वाजण्याच्या पारा ३१.७ अंशावर गेला होता. त्याच्यानंतर मात्र हा पारा घसरताना दिसून आला.

- Advertisement -

सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या पारा २३.४ अंशावर आला होता. हा आणखी खाली येण्याची शक्यता असून हे वातावरण असेच अजून काही दिवस राहण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. सातत्याने दिवसभर वाहणारी हवेमध्ये गारवा असल्याने ती हवा बोचणारीच आहे असे वाट असल्याचे बोलले जात आहे. या गारव्याचा आनंद ठाण्यातील लहान थोर घेत आहेत. असेच दिसत आहे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -