Drone Attack: महाराष्ट्रात ड्रोन हल्ल्याची भीती, डार्क नेटवर शिजलेल्या दहशतवाद्यांच्या कटाचे संभाषण यंत्रणेच्या हाती

महाराष्ट्रावर दहशतवादी हल्ल्याचे सावट आले आहे. त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणेच्या मार्फत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

ड्रोन जितके उपयोगी असतात तितकेच ते घातक असतात. अशात देशात जम्मू काश्मीर आणि पंजाबमध्ये सातत्याने संभाव्य ड्रोन हल्ल्यांबाबत केंद्रीय तपास यंत्रणा सातत्याने अलर्ट मोडमध्ये असते. आता तपास यंत्रणांना मुंबईसह महाराष्ट्रावर होणाऱ्या ड्रोन हल्ल्यासंदर्भातील माहिती हाती लागली आहे. डार्कनेटवर शिजलेला दहशतवाद्यांचा कट यंत्रणांच्या समोर आला आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रावर ड्रोन हल्ला झाला तर अँटी-ड्रोन यंत्रणाही आपल्याकडे नाही, ही बाब महाराष्ट्र सायबर पोलिसांनीही मान्य केली आहे.

दोन आठवड्यांवर प्रजासत्ताक दिन येऊन ठेपला आहे. त्यापूर्वी महाराष्ट्रावर दहशतवादी हल्ल्याचे सावट आले आहे. डार्क नेटचा वापर करून मुंबई आणि महाराष्ट्रावर ड्रोन हल्ला करण्याचे संभाषण तपास यंत्रणेच्या हाती लागले आहे. त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणेच्या मार्फत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्र सायबर विभागाने आपल्या अहवालात दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी वृत्तीचे व्यक्ती डार्क नेटवर ड्रोन हल्ले, रासायनिक हल्ले आणि सायबर हल्ल्यांबाबत चर्चा करत होते. पृष्ठभागाच्या जाळ्याच्या तुलनेत डार्क नेट ९९ टक्के आहे. डार्क नेटमध्ये टोर ब्राउझर वापरला जातो, जो सहजपणे ट्रेस करता येत नाही. कारण त्यामध्ये अनेक प्रॉक्सी बाऊन्सिंगचा वापर केला जातो. अनेकदा मुंबईसह इतर महत्त्वाच्या शहरांवर ड्रोन हल्ल्यांसंदर्भात अलर्ट दिले जातात.

ड्रोन हल्ला का धोकादायक असतो?

महाराष्ट्र सायबर आयजी यशस्वी यादव म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये अँटी ड्रोन सिस्टम (Anti Drone System) लवकरात लवकर लावले पाहिजे. ड्रोन हल्ल्यामध्ये २० किमी ते ३० किमी दूर हल्ला केला जाऊ शकतो. ड्रोनवर पेलोड लावले जाऊ शकते. याशिवाय त्यांना बॅकट्रॅक करणे सोपे नसते. जर कोणी गुन्हेगार मोबाईलचा वापर करतो तर त्याच्या आयएमईआय नंबरवरून त्याचा शोध लावला जाऊ शकतो. परंतु ड्रोन बॅकट्रॅक करून गुन्हेगाराचा शोध घेतला जाऊ शकत नाही. आता वेगवेगळ्या सायबर सेलसाठी एक नोडल एजेंसीचा प्रोजेक्ट घेऊन येत आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, या सायबर सिक्युरिटीचे नावाच्या प्रोजेक्टसाठी जवळपास ९०० कोटी बजेट ठेवले आहे.


हेही वाचा – पोलिसांच्या बदल्यांची ती यादी खोडसाळपणाने व्हायरल, गृहमंत्री वळसे पाटलांकडून चौकशीचा आदेश