वानखेडेंविरोधात बोलल्याने नवाब मलिक यांना धमकीचा फोन, मलिकांच्या सुरक्षेत वाढ

drug bust case nawab malik threat calls from rajasthan for allegations on sameer wankhede

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी मागील काही दिवसांपासून एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात गंभीर आरोप केले आहे. वानखेडेंवर केलेल्या आरोपांमुळे नवाब मलिकांना वेगवेगळ्या राज्यातून धमकीचे फोन येऊ लागले आहेत. राजस्थानमधून नवाब मलिकांना वानखेडेंविरोधात बोललात तर महागात पडेल अशा धमकीचा फोन आला आहे. यामुळे नवाब मलिक यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मागील आठवड्यातच नवाब मलिक यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आली होती अता त्यामध्ये अधिकचे सुरक्षा रक्षक देण्यात आले आहेत.

एनसीबीने केलेल्या ड्रग्ज प्रकरणात शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केली आहे. या कारवाईत भाजपशी संबंधीत काही लोकं होते. मुंबई एनसीबी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी ही कारवाई केली होती. वानखेडेंनी बोगस कारवाई केली असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. मलिकांच्या आरोपांवर समीर वानखेडे यांनी प्रत्युत्तर देत मलिकांचे आरोप फेटाळले होते. समीर वानखेडेंनी मालदीवमध्ये जाऊन वसुली केली असल्याचा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना वेगवेगळ्या राज्यांतून धमकीचे फोन येत आहेत. एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिक गेल्या काही दिवसांपासून सतत आरोप करत आहेत. या आरोपांमुळेच हा धमकीचा फोन आला आहे. मलिकांना शुक्रवारी सकाळी राजस्थान येथून धमकीचा फोन आला. हा फोन मलिकांच्या सुरक्षा रक्षकाने उचलला होता.

….तर महागात पडेल

शुक्रवार २२ ऑक्टोबर २०२१ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना धमकीचा फोन आला. समीर वानखेडे चांगले काम करत आहेत. त्यांच्याविरोधात आरोप करणं बंद करा अन्यथा तुम्हाला महागात पडेल अशी धमकी या व्यक्तीने दिली होती. राजस्थानमधून हा फोन आला असल्याचे समजते आहे.

नवाब मलिकांचा वानखेडेंवर आरोप

एनसीबीने कॉर्डेलिया क्रूझवर केलेली कारवाई बनावट आहे. केवळ सिनेसृष्टीला बदनाम करण्यासाठी ही कारवाई करण्यात येत आहे. समीर वानखेडे आणि जास्मीन वानखेडे यांनी दुबई, मालदीवमध्ये जाऊन फिल्म इंडस्ट्रीकडून वसुली केली असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला असून याबाबत एनसीबीने खुलासा करण्याची मागणी केली आहे. समीर वानखेडे मालदीवमध्ये काय करत होते याचेही उत्तर नवाब मलिकांनी मागितले आहे.

समीर वानखेडेंना तुरुंगात टाकणार

नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंना वर्षभरात तुरुंगात टाकणार असा दावा केला आहे. मलिक यांनी गुरुवारी एका कार्यक्रमात थेट वानखेडेंना तुरुंगात टाकणार असल्याचा दावा केला आहे. समीर वानखेडे बोगस अधिकारी आहे. त्याची कारवाई बोगस आहे. त्याची वर्षभरात नोकरी जाईल आणि त्याला तुरुंगात टाकणार असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे.


हेही वाचा : सरकार पडत नसल्यामुळे वेगवेगळ्या यंत्रणांद्वारे कारवाई, जयंत पाटील यांचा केंद्रावर निशाणा