drug case : ये कौन है भाई?, अमृता फडणवीस अन् ‘त्या’ व्यक्तीचा फोटो ट्विट करून मलिकांनी विचारले BJPचे ड्रग्ज कनेक्शन

drug case: nawab malik asked about BJP's drug connection tweet Amrita Fadnavis and drug peddler jaideep rana photo
drug case : ये कौन है भाई?, अमृता फडणवीस अन् 'त्या' व्यक्तीचा फोटो ट्विट करून मलिकांनी विचारले BJPचे ड्रग्ज कनेक्शन

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकांनी पुन्हा एक फोटो ट्विट करत एनसीबी आणि भाजपला सवाल केला आहे. एनसीबी अधिकारी यांची कारवाई बोगस आणि त्यांनी बोगस कागदपत्रांचा उपयोग करुन सरकारी नोकरी मिळवली असा आरोप नवाब मलिकांनी केला होता. नवाब मलिकांनी लागोपाठ अनेक आरोप आणि खुलासे वानखेडे आणि भाजपविरोधात केले आहेत. एका ड्रग्ज पेडलरचा फोटो ट्विट करत नवाब मलिकांनी हा व्यक्त कोण आहे असा सवाल केला आहे.

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकांनी केंद्रीय यंत्रणा एनसीबीच्या ड्रग्ज कारवाईवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. मी एनसीबीच्या कारवाईविरोधात नाही परंतु बोगस कारवाई आणि वसुलीच्या विरोधात असल्याचे नवाब मलिकांनी सांगितले आहे. तर समीर एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात अनेक गौप्यस्फोट आणि आरोप नवाब मलिकांनी केला आहे. एनसीबी अधिकारी आणि भाजपचा काय संबंध आहे. याबाबतचा खुलासा नवाब मलिक करणार आहेत. मलिक मागील काही दिवसांपासून रोज नवे नवे खुलासे करुन राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देत आहेत. तर आज भाजप आणि ड्रग्ज पेडलरचा संबंध काय याबाबत चर्चा करुया असा इशारा नवाब मलिकांनी दिला आहे.

एका अज्ञात व्यक्तीचा फोटो ट्विट करत मंत्री नवाब मलिक यांनी हा व्यक्ती कोण आहे? असा सवाल केला आहे. दरम्यान राजकीय विश्लेषक निषांत वर्मा यांनीसुद्धा या व्यकीचा फोटो ट्विट केला असून यामध्ये राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस दिसत आहेत. फोटोतील व्यक्ती हा ड्रग्ज पेडलर असून अमृता फडणवीस यांच्यासोबत फोटो असल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

फोटोतील व्यक्ती ड्रग्ज पेडलर

दरम्यान नवाब मलिकांनी ट्विट केलेला फोटो हा ड्रग्ज पेडलर जयदीप राणा याचा आहे. राजकीय विश्लेषक निशांत वर्मा यांनीसुद्धा हा फोटो ट्विट केला असून त्यांनी असे म्हटलं आहे की, फोटोतील व्यक्ती जयदीप चंदूलाल राणा असून त्याला एनसीबीने जून २०२१ रोजी एनसीबीकडून अटक करण्यात आली आहे. राणा सध्या तुरुंगात आहे. अमृता फडणवीस यांच्यासोबत फोटो असल्यामुळे त्याचे आणि भाजपचा संबंध काय? असा सवाल वर्मा यांनी उपस्थित केला आहे.


हेही वाचा : नवाब मलिकांच्या जावयाची सुटका; संबंधितांना हवी होती खंडणीत लँडक्रुझर?