घरताज्या घडामोडीdrug case : समीर वानखेडेंवर एनसीबी कार्यालयाबाहेर पुष्पवृष्टी, शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थानकडून...

drug case : समीर वानखेडेंवर एनसीबी कार्यालयाबाहेर पुष्पवृष्टी, शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थानकडून सत्कार

Subscribe

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात ड्रग्ज कारवाई प्रकरणी अनेक आरोप करण्यात आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी वानखेडेंची जात, धर्म आणि बोगस कारवाईवरुन अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. तर वानखेडेंना अनेकांचा पाठिंबा मिळत असून याचा प्रत्यक्ष परिचयही आला आहे. समीर वानखेडे एनसीबी कार्यालयात जात असताना त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली असून सत्कार करण्यात आला आहे. शिव प्रतिष्ठान युवा हिंदूस्थानकडून हा सत्कार करण्यात आला आहे.

शिवप्रतिष्ठान युवा हिंदूस्थानच्या कार्यकर्त्यांनी एनसीबी कार्यालयाबाहेर गर्दी केली होती. नेहमीच्या वेळी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे एनसीबी कार्यालयात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत वानखेडेंचे स्वागत केले. त्यांच्यावर पुष्पवृष्टी करुन छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट दिली आहे. तसेच आपण एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या पाठीशी असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. राजकीय हेतूने वानखेडेंवर आरोप करण्यात येत असून याचा निषेध करत असल्याचेही शिव प्रतिष्ठान युवा हिंदूस्थानच्या कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

समीर वानखेडेंची कारवाई योग्य

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी राज्यात ड्रग्ज प्रकरणात केलेली कारवाई योग्य आहे. केवळ राजकीय हेतूपोटी राजकारणी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक आरोप करत आहेत. वानखेडेंवर राजकीय दबाव टाकण्याचा प्रयत्न होत आहे. नवाब मलिकांचा आम्ही निषेध करत आहोत. राज्याला ड्रग्जमुक्त करण्यासाठी आणि युवा पिढीला ड्रग्जमुक्त करण्यासाठी समीर वानखेडे प्रामाणिकपणे काम करत आहेत. त्यामुळे आमचा त्यांना पाठिंबा असून त्यांनी असेच काम करत राज्य ड्रग्जमुक्त करावे असं पदाधिकाऱ्याने म्हटलं आहे.

समीर वानखेडेंवर नवाब मलिकांचे आरोप

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर बोगस कारवाईचे गंभीर आरोप केले आहेत. समीर वानखेडे बोगस कारवाई करतात, वानखेडेंच्या माध्यमातून वसुली सुरु आहे. वानखेडेंनी बोगस जातप्रमाणपत्र दाखवत केंद्रीय तपास यंत्रणेत नोकरी मिळवली असून त्यांचे जातप्रमाणपत्र बोगस आहे. समीर वानखेडे कोट्यावधींचे कपडे वापरतात असून त्यांचे घड्याल लाखो रुपयांचे तर पँट ५० हजार शर्टसह सगळ्याच गोष्टी महागड्या वापरत असल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : राज्यात ३० नोव्हेंबरपर्यंत लसीकरण १०० टक्के करा, मुख्यमंत्र्यांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -