Homeक्राइमDrug trafficking : ड्रग्जप्रकरणाचा तब्बल 37 वर्षांनी निकाल, व्यावसायिकाला 20 वर्षांचा सश्रम...

Drug trafficking : ड्रग्जप्रकरणाचा तब्बल 37 वर्षांनी निकाल, व्यावसायिकाला 20 वर्षांचा सश्रम कारावास

Subscribe

तरुणांमधील अंमली पदार्थांच्या व्यसनाधीनतेची व्यापक समस्या तसेच अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी लागू करण्यात आलेले कठोर नियम लक्षात घेता, आरोपीबाबत नरमाईची भूमिका दाखवणे योग्य ठरणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.

(Drug trafficking) मुंबई : मुंबईतील एका न्यायालयाने ड्रग्ज प्रकरणात तब्बल 37 वर्षांनी निकाल दिला आहे. सांताक्रुझमधील एक व्यावसायिक याप्रकरणात आरोपी असून त्याच्या आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करून न्यायालयाने त्याला 20 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. चटणीच्या ड्रमच्या नावाखाली 2.61 कोटी रुपयांच्या या अंमली पदार्थाची तस्करी करण्यात येणार होती. तेवढ्यात पोलिसांनी हा साठा पकडला. (The court sentenced the accused to 20 years rigorous imprisonment after 37 years)

महसूल गुप्तवार्ता संचालनालयाच्या (DRI) अधिकाऱ्यांनी 2 जुलै 1987 रोजी मिळालेल्या खबरीच्या आधारे विक्रोळी येथील एका गोदामावर छापा टाकला आणि चटणीच्या 194 ड्रममध्ये दडवलेले 4 हजर 365 किलो चरस जप्त केले. हे ड्रग्ज लंडनमध्ये पाठविण्यात येणार होते. याप्रकरणी पोलिसांनी अनेकांना अटक केली. त्यात नितीन भानुशाली (65) याचाही समावेश होता. हे गोदाम भाड्याने घेतल्याचा आरोप नितीन भानुशाली याच्यावर होता आणि याच गोदामात अंमली पदार्थ ठेवण्यात आले होते. निर्यातीसंबंधीची बनावट कागदपत्रे तयार करण्यातही त्याने मदत केल्याचे उघड झाले होते.

हेही वाचा – New Year 2025 : नव्या वर्षाच्या स्वागताला सारेच सज्ज, पहिल्याच दिवशी एवढी असेल लोकसंख्या!

आरोपी नितीन भानुशाली याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी सरकारी वकिलांनी न्यायालयाकडे केली. या प्रकरणी 37 वर्षांपासून शिक्षा भोगत असलेला नितीन भानुशाली याला यापूर्वीही आणखी दोन प्रकरणांमध्ये दोषी ठरविण्यात आले होते. एनडीपीएस कायद्यानुसार दोनदा दोषी आढळलेल्या व्यक्तीला फाशीची शिक्षा होऊ शकते. तथापि, याप्रकरणी भानुशालीला याचा पश्चात्ताप झाल्याचे दिसत नाही, अशी टिप्पणी करत, विशेष न्यायाधीश एस ई बांगर यांनी नितीन भानुशाली याला 20 वर्षांचा सश्रम कारावास आणि 10 लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली.

तरुणांमधील अंमली पदार्थांच्या व्यसनाधीनतेची व्यापक समस्या तसेच अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी लागू करण्यात आलेले कठोर नियम लक्षात घेता, आरोपीबाबत नरमाईची भूमिका दाखवणे योग्य ठरणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. 2010मध्ये तीन आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली होती. त्याचा संदर्भ देत न्यायाधीशांनी, त्या निकालातील टिप्पण्यांशी असहमती दर्शविली. प्रारंभिक तपासणीनंतर नवीन साक्षीदार तपासले गेले आणि फिर्यादीच्या पुराव्यांचा पुरेसा विचार केला गेला नाही, असे मत न्यायमूर्तींनी मांडले. तर, त्यावेळी जामीन मिळाल्यानंतर नितीन भानुशाली फरार झाला होता. त्यामुळे त्याला पुन्हा अटक केल्यानंतर त्याचा खटला स्वतंत्रपणे चलविण्यात आला. (Drug trafficking: The court sentenced the accused to 20 years rigorous imprisonment after 37 years)

हेही वाचा – Nitesh Rane Controversy : नितेश राणेंच्या त्या वक्तव्यावरून केरळचे मुख्यमंत्री संतापले, म्हणाले…


Edited by Manoj S. Joshi