घर क्राइम Drugs at the beach : कोट्यवधीचे ड्रग्स समुद्र किनाऱ्यावरून आले वाहून; तर्कवितर्कांना उधाण

Drugs at the beach : कोट्यवधीचे ड्रग्स समुद्र किनाऱ्यावरून आले वाहून; तर्कवितर्कांना उधाण

Subscribe

राज्यासह देशभरात प्रतिबंधीत असलेल्या ड्रग्सची पाकीटे रत्नागिरी जिल्ह्यातील सात वेगवेगळ्या किनाऱ्यांवरून सीमाशुल्क विभागाने ताब्यात घेतले.

मुंबई : समुद्राची खोली जशी कुणी मोजू शकत नाही अगदीच तसेच मुंबईतील समुद्र किनारी कधी काय घडेल हे सांगता येत नाही. अगदीच त्या प्रकारेच एक घटना सध्या उघडकीस आली आहे. ती म्हणजे राज्याच्या पश्चिम टोकाला असलेल्या समुद्र किनाऱ्यावर 250 किलोहून अधिक ड्रग्सचे पाकिटे वाहून आल्याने खळबळ उडाली आहे. मात्र, हे पाकिटे कुणी टाकले?, एवढा मोठा ड्रग्सचा साठा कुणाच्या मालकीचा होता याबाबत सीमाशुल्क विभाग चौकशी करत असून, या चौकशीअंती ड्रग्स रॅकेटमधील मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.(Drugs at the beach Millions of drugs come from the beach Challenge the arguments)

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यासह देशभरात प्रतिबंधीत असलेल्या ड्रग्सची पाकीटे रत्नागिरी जिल्ह्यातील सात वेगवेगळ्या किनाऱ्यांवरून सीमाशुल्क विभागाने ताब्यात घेतले. प्रशासनाकडून आधीच निर्बंध लादण्यात आलेल्या या ड्रग्सचे प्लास्टिकच्या पिशव्यांचे पॅकेट्स 14 ते 17 ऑगस्ट दरम्यान समुद्र किनाऱ्यांवर वाहून आल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

या समुद्र किनारी आढळले ड्रग्स

- Advertisement -

सीमा शुल्क विभागाच्या कारवाईत समोर आलेल्या माहितीनुसार, कर्डे, लाडघर, केळशी, कोलथरे, मुरुड, बुरुंडी, दाभोळ आणि बोर्या समुद्रकिनाऱ्यांवर ही ड्रग्सची पाकिटे जप्त करण्यात आली आहेत.

हेही वाचा : चांद्रयान-3 मोहिमेची अभिनेता प्रकाशराजने उडवली खिल्ली; आता करावा लागतोय ट्रोलर्सच्या ‘टोळ्यांचा’ सामना

पाकिस्तान किंवा अफगाणीस्तानमधून आल्याचा संशय

- Advertisement -

राज्यातील वेगवेगळ्या समुद्रकिनाऱ्यांवर वाहून आलेली ड्रग्सची पाकिटे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधून वाहून आली असावीत, असा सीमाशुल्क विभागाला संशय आहे. ही अंमली पदार्थांची पाकिटे एकतर समुद्रात पडली असतील किंवा अंमली पदार्थांच्या तस्करीच्या उद्देशाने परदेशी जहाजांमधून फेकण्यात आली असतील, असा संशयही सीमाशुल्क विभागाकडून व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा : “महाराष्ट्रातील राजकारणात कबड्डी सुरू”, जितेंद्र आव्हाडांची सरकारवर निशाणा

पोरबंदर जिल्ह्यातही घडला होता असाच प्रकार

गेल्या वर्षी 2022 मध्ये गुजरातमधील पोरबंदर आणि जुनागढ जिल्ह्यात समुद्र किनाऱ्या लगतच्या भागातही ड्रग्जचे पॅकेट्स वाहून आले होते. 59 प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये पॅक केलेले ड्रग्ज किनाऱ्यावर आढळून आले होते. प्रत्येक पॅकेटचे वजन सुमारे एक किलो होते. जुनागडमधील मंगरोळ आणि पोरबंदरमधील माधवपूर येथून संशयित ड्रग्ज असलेली पाकिटं जप्त करण्यात आली होती.

- Advertisment -