मुंबई पोलिसांनी कोल्हापुरातील ड्रग्ज कारखाना केला उद्ध्वस्त; कोट्यावधीचे ड्रग्ज केले जप्त

Kolhapur drugs case

मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने कोल्हापुरात मोठी कारवाई केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात असणाऱ्या एमडीचा (मेफेड्रोन) कारखान उद्ध्वस्त केला. माहितीनुसार कोल्हापुरमधील हा कारखाना मुंबईतील एका वकीलाकडून हा ड्रग्ज बनवण्याचा कारखान चालवला जात होता. आता मुंबई पोलिसांनी कारवाई करून एमडी तयार करण्यासाठी लागणार कच्चा माल मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आला आहे. या कारखान्याच्या केअर टेकरसह मुंबईतील वकीलाला अटक करण्यात आली आहे. दरम्यान आज, बुधवारी दोघा आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येईल.

डीसीपी दत्ता नलावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या वांद्रे युनिटने एका महिलेला अटक केली आहे. तिला ५० ग्रॅम एमडी सहित अटक केली होती. हे ड्रग्ज कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड गावातील ढोलगरवाडी गावातून आल्याचे स्पष्ट झाले होते. वांद्रे युनिट आणि घाटकोपर युनिटच्या तीन टीम तिकडे पाठवण्यात आल्या होत्या आणि तिकडे एका फार्महाऊसवर सर्च ऑपरेशन करण्यात आले. ३८ किलो ७०० ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आणि इतर साहित्य हस्तगत करण्यात आले. तसेच रॉ मटेरियलसुद्धा जप्त करण्यात आले. एकूण २ कोटी ३५ लाख रुपयांचे हे ड्रग्ज आहे जे ढोलगरवाडी गावातल्या फार्महाऊसवरून ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणात आतापर्यंत दोघांना अटक करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.

३९ लीटर केमिकल आणि एमडी ड्रग्ज बनवण्यासाठी लागणार साहित्यसुद्धा मिळून आले आहे. या फार्महाऊसचा जो केअरटेकर आहे त्याला देखील अटक करण्यात आली आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून ही प्रक्रिया सुरू होती. आरोपी मुंबईवरून तिकडे जायचा, तयार झालेले एमडी ड्रग्ज घेऊन परत मुंबईला यायचा आणि नवीन ड्रग्ज बनवण्यासाठी तिथे दुसरे मटेरियल तिकडे ठेवून यायचा. या फार्महाऊसचा जो केअरटेकर आहे तो या प्रक्रियेत सहभागी होता. शिवाय मुंबईला जे एमडी सप्लाय केले जात होते त्यातसुद्धा त्याचा सहभाग होता. आतापर्यंतच्या तपासात स्थानिक पातळीवर कोणतीही सप्लाय चैन आढळून आलेली नाही. या प्रकरणात मुख्य आरोपी आणि त्या फार्महाऊसचा केअरटेकर या दोघांचाच सहभाग आढळून आला आहे. मुख्य आरोपी हा मूळचा ढोलगरवाडी गावाचा आहे तो कामानिमित्त मुंबईत राहत होता. मुंबईत अटक करण्यात आलेली महिला एक पेडलर आहे. तसेच अटक करण्यात आलेला मुख्य आरोपी पेशाने वकील आहे, अशी माहिती डीसीपी दत्ता नलावडे यांनी दिली आहे.


हेही वाचा – अभिनेता अनिकेत विश्वासराव विरोधात गुन्हा दाखल, पत्नीचे गंभीर आरोप