Drugs Case : वाझेंप्रमाणेच ड्रग्ज माफिया वसुली करत आहे का? भाजपचा ठाकरे सरकारला सवाल

ड्रग्ज माफिया तुमचे कोण लागतात?

Drugs Case Ram kadam criticism on thackeray government over sameer Wankhede
Drugs Case : वाझेंप्रमाणेच ड्रग्ज माफिया वसुली करत आहे का? भाजपचा ठाकरे सरकारला सवाल

सचिन वाझेंप्रमाणेच ड्रग्ज माफिया वसुली करत आहे का? असा सवाल भाजप आमदार राम कदम यांनी राज्य सरकारला केला आहे. एनसीबी झोनल डायरेक्टर समीर वानखेडेंवरील पाळतवरुन महाविकास आघाडी सरकारवर राम कदम यांनी निशाणा साधला आहे. मुंबई पोलीस वानखेडेंवर पाळत ठेवत असल्याची तक्रार समीर वानखेडे यांनी केली आहे. वानखेडेंवर ठेवण्यात येणाऱ्या पाळतवरुन भाजपकडून ठाकरे सरकारवर हल्लाबोल करण्यात आला आहे. ड्रग्ज माफियांना महाविकास आघाडीचा पाठिंबा आहे का? असा सवाल राम कदम यांनी उपस्थित केला आहे. तसेच ड्रग्ज माफिया राज्य सरकारचे कोण लागतात असा प्रश्न राम कदम यांनी केला आहे.

भाजप नेते आणि आमदार राम कदम यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. भाजप नेते राम कदम यांनी म्हटलं आहे की, एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी पोलीसात तक्रार केली आहे की, काही लोकांकडून त्यांच्यावर पाळत ठेवण्यात येत आहे. हे कोण लोकं आहेत. त्यांची माहिती ठेवत आहेत. जी माहिती मिळाली आहे त्यानुसार असे समजते आहे की, महाराष्ट्र सरकारने त्यांच्यावर पोलीसांना मागे लावून पाळत ठेवण्यात येत आहे.

ड्रग्ज माफिया तुमचे कोण लागतात?

एनसीबीच्या ड्रग्जविरोधी कारवाईवरुन महाराष्ट्र, देशातील जनता पाठिंबा देत असताना महाराष्ट्र सरकार वानखेडेंवर पाळत ठेवत आहे. त्यांची माहिती ठेवण्यात येत आहे. एनसीबी कधी कुठे छापेमारी करणार याची माहिती घेत आहे. राज्य सरकार पहिलेच माहिती घेऊन माफियांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत का? हे ड्रग्ज माफिया राज्य सरकारचे कोण लागतात यांच्या वागणुकीवर संशय निर्माण होत आहे. महाविकास आघाडीमध्ये ज्या प्रकारे सचिन वाझे वसूली करत होता तसेच माफियांकडूनही मोठ्या प्रमाणात वसूली येत आहे का? म्हणून एनसीबीवर पाळत ठेवण्यात येतेय का? याचे उत्तर महाराष्ट्र सरकारने दिलं पाहिजे असे राम कदम यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : ‘मला आजही मीच मुख्यमंत्री आहे असं वाटतं’ – देवेंद्र फडणवीस