drugs racket : राज्यात ड्रग्सविरोधात NCB ची मोठी कारवाई, एका वर्षात सुमारे ३०० कोटींचे ड्रग्स जप्त

drugs racket NCB worth Rs 300 crore Drugs seized over last one year in Maharashtra
drugs racket : राज्यात ड्रग्सविरोधात NCB ची मोठी कारवाई, एका वर्षात सुमारे ३०० कोटींचे ड्रग्स जप्त

राज्याच अंमली पदार्थाचा विळखा अधिकच घट्ट होत असून आत्तापर्यंत अनेक ड्रग्स माफियांना NBC ने अटक केली आहे. बॉलिवूड अभिनेता सुशांत राजपूत मृत्यूप्रकरणात समोर आलेल्या बॉलिवूड ड्रग्स रॅकेटनंतर राज्यभरात एनसीबीने विविध ठिकाणी छापेमारी केली. यात अनके बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते, अभिनेत्रींना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.तर या ड्रग्स रॅकेटचे अंडरवर्ल्ड कनेक्शन उघड झाले होते. अशातच नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरोने एका वर्षातील ड्रग्स रॅकेटविरोधात मुंबईसह राज्यभरात (एनसीबी) केलेल्या कारवाईची आकडेवारी जाहीर केली आहे.

एनसीबीने मुंबईसह राज्यात विविध ठिकाणी एका वर्षात तब्बल ३०० कोटींचे ड्रग्स जप्त केले आहे. याशिवाय मुंबईसह राज्यभरातून आत्तापर्यंत सुमारे छोट्या मोठ्या अशा ३०० ड्रग्स विक्रेत्यांना अटक केली आहे.

जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थमध्ये ३० किलो चरस, १२ किलो हेरॉईन,३५० किलो गांजा आणि २५ किलो एमडी (मेफेड्रोन) या अमली पदार्थांचा समावेश आहे. अशी माहिती एनसीबीने दिली आहे. यातून राज्यातील ड्रग्स रॅकेट विस्तार अधिकचं फैलावत असल्याचे पाहायला मिळत आहे.

राज्यात अमली पदार्थाच्या विक्रीसाठी बंदी आहे. तरीही ड्रग्ज माफियाने विविध खुप्या मार्गाने विक्रीचे जाळे विस्तारत आहेत. यात अनेक शहरांमध्ये सध्या या घातक ड्रग्सची ऑनलाईन विक्री केली जात आहे. पोलिसांच्या कारवाईनंतर छुप्या पद्धतीने हे ड्रग्स अतिशय महाग दरात विकले जातातय. अफू, चरस, गांजा यासह मेफ्रेडोनसारख्या ड्रग्सची खुलेआम विक्री अद्यापही होत असून यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह शहरी भागातील उच्चभ्रू व्यक्ती मोठय़ा प्रमाणात ड्रग्स व्यसनात गुरफटत असल्याचे पाहायला मिळत आहे.