घरक्राइममुंबईत 502 कोटींचे ड्रग्ज जप्त; डीआरआयची मोठी कारवाई

मुंबईत 502 कोटींचे ड्रग्ज जप्त; डीआरआयची मोठी कारवाई

Subscribe

मुंबईतून तब्बल 502 कोटींचे ड्रग्ज जप्त केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. दक्षिण आफ्रिकेतून फळांच्या कंटेनरमधून ड्रग्सची तस्करी केली जात होती. सफरचंद या फळाची आयात करण्याच्या नावाखाली कोकेन तस्करीवर कारवाई करण्यात महसूल गुप्तवार्ता संचलनालयाला (डीआरआय) यश आले आहे.

मुंबईतून तब्बल 502 कोटींचे ड्रग्ज जप्त केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. दक्षिण आफ्रिकेतून फळांच्या कंटेनरमधून ड्रग्सची तस्करी केली जात होती. सफरचंद या फळाची आयात करण्याच्या नावाखाली कोकेन तस्करीवर कारवाई करण्यात महसूल गुप्तवार्ता संचलनालयाला (डीआरआय) यश आले आहे. डीआरआयने या कारवाईत 50 किलो 200 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले असून, या कोकेनची किंमत 502 कोटी रुपये आहे. (Drugs Seized 50 Kg 200 Gm Drugs Worth Rs 502 Crore Smuggled In Apple Boxes Mumbai)

मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण आफ्रिकेतून आयात केलेल्या फळांच्या कंटेनरमध्ये कोकेनचा मोठा साठा असल्याची माहिती डीआरआयला मिळाली होती. या माहितीच्या आधारे 5 ऑक्टोबरला डीारआयने नवी मुंबईतील न्हावाशेवा बंदरात शोध मोहिम राबवली. त्यावेळी तेळी कंटेनर फ्रेट स्टेशन(सीएफएस) येथे तपासणीदरम्यान एका कंटेनरमधून त्यात 1880 खोके होते. त्यांच्या तपासणीत कोकेनची 50 पाकिटे सापडली. त्याची तपासणी केली असता त्यात 50 किलो 200 ग्रॅम कोकेन असल्याचे निष्पन्न झाले. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत 502 कोटी रुपये आहे.

- Advertisement -

अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत हा साठा जप्त करण्यात आला. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समजते. याप्रकरणी डीआरआयने अधिक तपास केला असता, केरळातील रहिवासी असलेला मन्सूर थचापरंबन याचा याप्रकरणी सहभाग आढळला.

मन्सूर हा सध्या दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे असून तो मोर फ्रेश एक्सपोर्ट्र्स प्रायव्हेट नावाच्या कंपनीचा मालक आहे. या फळांची आयात केरळस्थित युम्मिट्टो इंटरनॅशनल फूड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने केल्याचे निष्पन्न झाले आहे.

- Advertisement -

गुजरातच्या समुद्रात पाकिस्तानी बोटीतून 50 किलो ड्रग्ज जप्त केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात एटीएस यांनी ही ड्रग्ज जप्तीची कारवाई केली. या 50 किलो हेरॉईन ड्रग्जची किंमत 350 कोटी रुपये असल्याची माहिती मिळते. याप्रकरणी भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसने संयुक्त कारवाई करत बोटीवरील 6 जणांना अटक केली.


हेही वाचा – गुजरातच्या समुद्रात पाकिस्तानी बोटीतून 350 कोटींचे 50 किलो ड्रग्ज जप्त; 6 जणांना अटक

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -