नौपाड्यात पकडला ७ कोटींचा अंमली पदार्थ

अंमली विरोधी पथकाची कारवाई, पान दुकानदार ताब्यात

drugs

नौपाडा, राम मारुती रोडवरील मोगॅम्बो पान किंग, पान टपरीवर ठाणे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने टाकलेल्या छाप्यात प्रतिबंधित असलेल्या वेगवेगळे कंपनीचे हुक्का फ्लेवर्सची पाकिटे आणि डबे मिळून आले आहेत.

याप्रकरणी पान शॉपवाला दर्शक दीपक माणेक (३१) याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील ६ लाख ९२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई १ ऑक्टोबर रोजी करण्यात आली आहे. ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पोवार, पोलीस उपनिरीक्षक संतोष धाडवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक परब या पथकाने केलेली आहे.