Friday, April 16, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र धक्कादायक : मद्यधुंद ट्रक चालकाची ८ जणांना धडक, ३ जण ठार

धक्कादायक : मद्यधुंद ट्रक चालकाची ८ जणांना धडक, ३ जण ठार

स्थानिक युवकांनी धाडस दाखवत ट्रक रोखून चालकाला पोलिसांच्या हवाली केले

Related Story

- Advertisement -

रेवदंडापासून रोह्याच्या दिशेने रवाना झालेल्या ट्रक चालाकाने तब्बल ८ जणांना ठोकर दिली आहे. त्यामुळे ४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर इतर ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. ट्रक चालक रस्त्यातील पादचाऱ्यांना ठोकर मारत चालवत होता. यामुळे काही नागरिकांना या ट्रकला रोखण्याचा प्रयत्न केला असता चालकाने त्यांनाही धडक देत ट्रक रोखला नाही अखेर काही तरुणांनी मोठ्या धाडसाने ट्रक रोखून चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

रोह्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकने आमली येथे एका व्यक्तीला उडवले यानंतर पुढील गावात आणखी दोन पादचाऱ्यांना ठोकर दिली. मध्यधुंद ट्रक चालकाने पादचाऱ्यांना धडक दिली असल्याची बातमी पुढील गावातील गावकाऱ्यांना मिळाली यानंतर या गावकाऱ्यांनी ट्रक रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु चालकाने अडथळ्यांना उडवून ट्रक पुढे सुसाट नेला. यानंतर दुचाकीवर प्रवास करणाऱ्या ३ जणांना जोरदार धडक मारली. जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार लक्ष्मण ढेबे यांचा आणि त्यांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पत्नीचे पाय निकामी झाले असून त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाले असल्याचे समजते आहे.

- Advertisement -

यानंतर ट्रक चालकाने दोन पादचाऱ्यांना ठोकर दिली यातील एकाचा जागीच मृत्यू झाला. अखेर चांडगाव जवळ स्थानिक युवकांनी धाडस दाखवत ट्रक रोखून चालकाला पोलिसांच्या हवाली केले आहे. चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

- Advertisement -