निफाड येथील ड्रायपोर्ट दोन वर्षात होणार कार्यान्वित; कृषी माल निर्यातीला मिळणार चालना

DryPort

नाशिक : कृषी व औद्योगिक क्षेत्रातील विकासात नाशिकला मोठा वाव आहे. महिन्याकाठी येथून होणारी आयात-निर्यात बघता येथील उत्पादित मालाला कमी वेळेत आणि परवडणार्‍या दरांमध्ये जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी जेनएपीएचा प्रयत्न आहे.निफाड येथील मल्ट्री मॉडेल लॉजिस्टीक पार्क अडथळे दुर करण्यात झाले आहेत. शासनाकडून लवकरच प्रकल्पाला मान्यता मिळवून दोेन वर्षात हे पार्क कार्यन्वित होईल, असा विश्वास जेनपीए अध्यक्ष संजय सेठी यांनी व्यक्त केला.

जेएनपीएने नाशिकमध्ये शुक्रवारी (दि.२४) इन्व्हेस्टर कॉन्कलेव्ह-२०२३ चे आयोजित करण्यात आली होती. यावेळी जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथोरिटीचे (जेएनपीए) अध्यक्ष संजय सेठी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी सेठी म्हणाले, निफाड ड्रायपोर्टमधील सर्व तांत्रिक अडचणी दुर झाल्या असून मल्ट्री मॉडेल लॉजिस्टीक पार्कच्या धर्तीवर ते विकसित करण्यात येणार आहे. निफाड येथील मल्ट्री मॉडेल लॉजिस्टीक पार्क अडथळे दुर करण्यात झाले आहेत.

शासनाकडून लवकरच प्रकल्पाला मान्यता मिळवून दोेन वर्षात हे पार्क कार्यन्वित होईल, असा विश्वास सेठी यांनी व्यक्त केला. हे पार्क रेल्वे आणि रस्ते मार्ग जोडले जाणार असून तेथे सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच हे पार्क थेट जेएनपीएशी जोडले जाणार असल्याने जलद आणि कमी खर्चात नाशिकचा कृषी तसेच अन्य उत्पादनांना मालाला जागतिक बाजारपेठ उपलब्ध होईल, असे सेठी म्हणाले. याप्रसंगी जेएनपीएचे उपाध्यक्ष उन्मेश वाघ, मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन बोरवणकर, जनसंपर्क अधिकारी अंबिका सिंह आदी उपस्थित होते.

पार्क साठी रेल्वेचे सहकार्य

निफाड येथे विकसीत करण्यात येणार्‍या मल्ट्री मॉडेल लॉजिस्टीक पार्कसाठी रेल्वेने सहकार्याची तयारी दर्शविली आहे. तेथील कंटेनर वाहतूकीसाठी सर्मपित मालगाडी रेल्वेसेवा उपलब्ध करून देण्याची ग्वाही रेल्वेने दिली आहे. रस्ते कनेक्टिव्हीटीसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाशी करार झाल्याचे संजय सेठी यांनी सांगितले.

सेझमध्ये गुंतवणूकीला वाव

जेएनपीएच्या पाच किलोमीटर परिघात पोर्ट ट्रस्टवर आधारित पहिला एसईझेड (सेझ) प्रकल्प कार्यान्वित केला आहे. या सेझमध्ये एक-दोन हेक्टरपासून ते सहा हेक्टरपर्यत उद्योजकांना प्लॉट उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यासाठी ५०० कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. येथील सर्व परवानगी एक खिडकीद्वारे देण्यात येत असून आतापर्यंत ४४ प्लॉट वितरीत केले आहेत. नाशिकच्या उद्योजकांनी या सेझमध्ये गुंतवणूक करावी, असे आवाहन सेठी यांनी केले.