Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी LPG टँकरचा भीषण अपघात; मुंबई-गोवा एक्स्प्रेस वेवरील पाली ते लांजा मार्ग रात्रभर...

LPG टँकरचा भीषण अपघात; मुंबई-गोवा एक्स्प्रेस वेवरील पाली ते लांजा मार्ग रात्रभर वाहतुकीसाठी बंद

Subscribe

मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. एलपीजीची वाहतूक करणारा टँकर नदीत कोसळल्याने मुंबई-गोवा महामार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. एलपीजीची वाहतूक करणारा टँकर नदीत कोसळल्याने मुंबई-गोवा महामार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. गुरूवारी दुपारी 3 वाजता हा अपघात झाल्याची माहिती मिळते. पुलाचा कठडा तोडून टँकर पाण्यात कोसळला आहे. (due to 28 kl LPG tanker fell into the river near Lanja Mumbai Goa highway will closed overnight )

गोवा महामार्गावरील लांजा तालुक्यातील आंजणारी पुलावरून एलपीजीची वाहतूक करणारा टँकर नदीत कोसळला आहे. त्यामुळे टँकमधून एलपीजी गॅसची गळती सुरु झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांच्या सुरक्षेसाठी आणि सावधानता म्हणून बुधवारी रात्रभर मुंबई-गोवा महामार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

- Advertisement -

सद्यस्थितीत एलपीजी टँकरची गळती तात्पुरत्या स्वरुपात रोखण्यात आली आहे. टॅंकरच्या अपघाताची माहिती मिळताच उरण आणि गोव्यावरून दोन टीम घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर नदीत कोसळलेला टॅंकर बाहेर काढण्याचे काम शर्तीच्या प्रयत्नांनी करत आहेत. गुरूवारी दुपारी 3 वाजता हा अपघात झाला आहे. पुलाचा कठडा तोडून टँकर पाण्यात कोसळला आहे. या टँकरमध्ये 28000 किलो एवढा प्रचंड एलपीजी गॅस भरलेला आहे.

हा कंटेनर मुंबईहून गोव्याच्या दिशेने काँप्रेस्ड एलपीजी घेऊन जात होता. लांजा तालुक्यातील आंजणारी पुलादरम्यान हा कंटेनर आला असता अपघातग्रस्त झाला. मुंबई गोवा महामार्गावरील या भागातून जाणार टप्पा बंद ठेवण्यात येणार आहे. पर्यायी मार्ग पालीतून दाभोळेमार्गे लांजा असा असणार आहे.


- Advertisement -

हेही वाचा – मुंबईतील खड्ड्यांच्या मुद्द्यावर बॉलिवूड कलाकारांचे तोंडावर बोट, चाहत्यांमध्ये मोठी नाराजी

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -