घरमहाराष्ट्र...म्हणूनच शिंदे सरकारला पेट्रोल-डिझेलवरील दरकपात करता आली - महेश तपासे

…म्हणूनच शिंदे सरकारला पेट्रोल-डिझेलवरील दरकपात करता आली – महेश तपासे

Subscribe

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दर कपातीची घोषणा केली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने याचे श्रेय महाविकास आघाडीचे आहे, असे म्हणत शिंदे गट आणि भाजपला टोला लगावला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दर कपातीची घोषणा केली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने याचे श्रेय महाविकास आघाडीचे आहे, असे म्हणत शिंदे गट आणि भाजपला टोला लगावला आहे. यावेळी महाविकास आघाडी सरकारमध्ये अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी कठीण काळात धोरणात्मक निर्णय घेऊन राज्याची तिजोरी सुरक्षित ठेवल्यामुळेच आताच्या शिंदेसरकारला पेट्रोल – डिझेलवरील दरकपात करता आली. असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी लगावला आहे.

- Advertisement -

शिंदेसरकारने पेट्रोलवरील ५ रुपये आणि डिझेलवरील ३ रुपये दर कमी केल्यानंतर महेश तपासे यांनी यामागे महाविकास आघाडीचे नेते अजितदादा पवार यांचे श्रेय असल्याचे सांगितले. पेट्रोल-डिझेलवरील दर कपात केली मात्र हे शिंदे सरकार येताच केंद्रसरकारने सामान्य माणूस आणि गृहिणींच्या किचनवर आर्थिक बोजा जीवनावश्यक वस्तूंवर लादलेल्या जीएसटीच्या रुपाने टाकला आहे. एकीकडे जनतेला दिलासा देत असल्याचे दाखवायचे आणि दुसरीकडे त्याअगोदर स्वतः च्या तिजोर्‍या भरुन घेण्याचे काम भाजपने केले आहे, असा थेट आरोप महेश तपासे यांनी केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय केली घोषणा –

- Advertisement -

केंद्र सरकारने ४ नोव्हेंबर २०२१ आणि २२ मे २०२२ रोजी पेट्रोल-डिझेलच्या करात कपात करण्यात आली होती. राज्य शासनाला देखील अशा प्रकारचं आवाहन केलं होतं. काही राज्यांनी त्यांच्या सूचना मान्य करून सरकारचे दर कमी केले होते. आपल्या महाराष्ट्र शासनाने ते कमी केले नव्हते. परंतु युतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर जनतेच्या हिताचे निर्णय घेतले पाहिजे, असं आम्ही मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठरवलं आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन पेट्रोलवर ५ रूपये आणि डिझेलवर ३ रूपये अशा प्रकारचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -