घरताज्या घडामोडीबेस्टच्या ताफ्यातील ४०० सीएनजी बसच्या सेवा तात्पुरत्या बंद

बेस्टच्या ताफ्यातील ४०० सीएनजी बसच्या सेवा तात्पुरत्या बंद

Subscribe

बेस्ट उपक्रमाच्या भाडेतत्त्वावरील बसगाड्यांना आगी लागण्याच्या घटना सतत घडत आहेत. गेल्या एका महिन्यात भाडे तत्त्वावरील बस गाड्यांना आग लागल्याच्या लागोपाठ घटना घडल्या आहेत. २५ जानेवारी रोजी बेस्टच्या भाडे तत्त्वावरील एका बसला आग लागल्याची घटना घडली होती. त्यानंतर पुन्हा ११ फेब्रुवारी रोजीही अंधेरी (पूर्व) चकाला जंक्शन येथेही आणखीन एका बसला आग लागल्याची घटना घडली होती.

बेस्ट उपक्रमाच्या भाडेतत्त्वावरील बसगाड्यांना आगी लागण्याच्या घटना सतत घडत आहेत. गेल्या एका महिन्यात भाडे तत्त्वावरील बस गाड्यांना आग लागल्याच्या लागोपाठ घटना घडल्या आहेत. त्यामुळे बेस्टच्या ताफ्यात ४०० सीएनजी कंत्राटी बसेसच्या सेवा तात्पुरत्या काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. (Due to continuous fire incident the safety of BEST passenger is on the rise)

२५ जानेवारी रोजी बेस्टच्या भाडे तत्त्वावरील एका बसला आग लागल्याची घटना घडली होती. त्यानंतर पुन्हा ११ फेब्रुवारी रोजीही अंधेरी (पूर्व) चकाला जंक्शन येथेही आणखीन एका बसला आग लागल्याची घटना घडली होती. त्यावेळी बस चालक, वाहक व ७ प्रवासी बचावले होते. त्यानंतर आता पुन्हा तिसऱ्यांदा म्हणजे बुधवारी सायंकाळी ६.३० वाजता अंधेरी (पूर्व) , आगरकर चौक येथे भाडे तत्त्वावरील बसला भीषण आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने, या तिन्ही घटनांत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.

- Advertisement -

या तिन्ही घटनांत बेस्टला भाडेतत्त्वावर बसपुरवठा करणाऱ्या मातेश्वरी कंपनीच्या तीन बसगाड्या आहेत. या तिन्ही घटना पाहता बेस्टच्या भाडेतत्त्वावरील बसगाड्यांच्या व प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

भाडे तत्त्वावरील बस पुरवठादार मातेश्वरीच्या बसगाड्यांचा प्रवर्तन रोखले

- Advertisement -

प्रतीक्षा नगर, धारावी, सांताक्रूझ व मजास बस आगार येथे भाडे तत्त्वावरील ४०० बसगाड्यांचा पुरवठा करणाऱ्या मातेश्वरी या बस पुरवठादाराच्या बसगाड्यांचे प्रवर्तन तडकाफडकी रोखण्याचा निर्णय घेतला आहे. बेस्टकडे अगोदरच प्रवासी बसगाड्यांची कमतरता असताना आता बेस्टने वरीलप्रमाणे निर्णय घेतल्याने सदर चार बस आगारामधून दररोज ३६ मार्गांवर बेस्ट बसने प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना पर्यायी बस सेवा बंद होणार असल्याने व पर्यायी बस सेवा उपलब्ध न झाल्यास हाल होणार आहे. प्रतीक्षा नगर बस आगारातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पर्यायी व्यवस्था उपलब्ध न झाल्यास त्यांचे खूपच हाल होणार असल्याचे बोलले जात आहे.

प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मातेश्वरीच्या ४०० बसचे प्रवर्तन रोखले : महाव्यवस्थापक

बेस्टला भाडे तत्वावर बसचा पुरवठा करणाऱ्या मातेश्वरीच्या बस गाड्यांना आगी लागण्याच्या घटना सतत घडत असल्याने प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मातेश्वरीच्या ४०० बसगाड्यांचे प्रवर्तन उद्यापासून काही दिवसांसाठी रोखण्यात आले आहे, अशी माहिती बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी दिली आहे. चार बस आगारातील ३६ बस मार्गावर त्याचा परिणाम होणार असल्याने पर्यायी व्यवस्था होईपर्यंत प्रवाशांनी आपली गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे त्यांनी म्हटले आहे.


हेही वाचा – अंधेरीत बेस्टच्या बसला भीषण आग; सुदैवाने जीवितहानी टळली

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -