घरताज्या घडामोडीCoronavirus : १५ दिवसांसाठी नगरमधील शासकीय कार्यक्रम रद्द

Coronavirus : १५ दिवसांसाठी नगरमधील शासकीय कार्यक्रम रद्द

Subscribe

करोनाच्या व्हायरसपासून बचावण्यासाठी सतर्क झालेल्या नगर जिल्हा प्रशासनाने पुढील पंधरा दिवसांसाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यक्रम तसेच मेळावे रद्द केले आहेत.

करोनाच्या व्हायरसपासून बचावण्यासाठी सतर्क झालेल्या नगर जिल्हा प्रशासनाने पुढील पंधरा दिवसांसाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यक्रम तसेच मेळावे रद्द केले आहेत. नगर जिल्ह्यामध्ये करोना संसर्गजन्य विषाणूची लागण झालेला एकही रुग्ण नसल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी पत्रकारांना दिली.

खबरदारी बाळगावी अथवा कार्यक्रम घेऊ नये

जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पत्रकार परिषदेत यासंबंधी माहिती देताना ते म्हणाले, ‘करोनासंदर्भात जिल्हा प्रशासनाने पूर्णतः सतर्कता बाळगली आहे. करोनावरून अस्वस्थ होण्याची गरज नाही. मात्र, होता होईल तेवढे गर्दी करण्याचे टाळावे. जिल्ह्यामध्ये जे-जे खासगी उत्सव, सण आणि इतर कार्यक्रम साजरे होणार असतील, त्याबद्दल खबरदारी बाळगावी अथवा कार्यक्रम घेऊ नये. नगर जिल्हावासीयांच्या सुजानतेवर प्रशासनाला विश्वास असून खबरदारी, दक्षता घेण्यासाठी नगरकर स्वयंस्फूर्तीने पुढे येतील. जागरुकतेबाबत नगरकरांचा पुढाकार असतो. त्यामुळे कमीत-कमी कायद्याचा वापर करून परिस्थिती हाताळली जाईल’, असे ते म्हणाले.

- Advertisement -

‘करोनाबाबत भीती बाळगण्याची गरज नाही. मात्र, गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे नागरिकांनी टाळावे. दुबईवरून आलेल्या चौघांचे रक्त आणि थुंकीचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहेत. या सर्वांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. परदेशातून ये-जा करणाऱ्या प्रवाशांची माहिती घेण्यासाठी ट्रॅव्हल्स, टूर एजन्सी चालकांची बैठक घेतली जाईल. तसेच मॉल, सिनेमागृहानादेखील स्वच्छतेबाबत निर्देश देण्यात आले आहेत. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांचे स्क्रीनिंग केले जात आहे. याशिवाय नागरिकांच्या शंका समाधानासाठी जिल्हा प्रशासनाने १०७७ हा टोल फ्री क्रमांक देखील सुरू केला आहे. करुणा संदर्भात नागरिकांना कोणतीही शंका असेल तर त्यांनी या क्रमांकावर संपर्क साधावा’, असे आवाहन जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी उदय किसवे, जिल्हा आरोग्य अधिकारी संदीप सांगळे, महापालिकेचे आरोग्य अधिकारी अनिल बोरगे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वीरेंद्र बडदे आणि जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण यावेळी उपस्थित होते.


हेही वाचा – करोनाशी दोन हात करायला, डॉक्टर कस्तुरबात सज्ज!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -