घरमहाराष्ट्रडिझेल दरवाढीमुळे लालपरीचा प्रवास महागणार....

डिझेल दरवाढीमुळे लालपरीचा प्रवास महागणार….

Subscribe

इंधन दरवाढीमुळे राज्याची लालपरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, एसटीपुढे ‘अपरिहार्य’ तिकिट दरवाढीचे संकट उभे राहिले आहे. एसटी प्रशासन तिकीट दरवाढ करण्याचा गांभीर्याने विचार करीत आहे. लवकरच एसटीचा प्रवास महागणार असून तो सर्वसामान्यांच्या आवाक्यात असेल का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
मागील वर्षी मे २०१७ मध्ये एसटीला मिळणाऱ्या डिझेलचा दर हा सरासरी रु.५८.०२/- इतका होता. तो यंदाच्या मे महिन्यात सरासरी रु.६८.३९/- इतका झाला आहे. डिझेल प्रति लीटर रु.१०.३७/- इतके महागले आहे. वाढत्या डिझेल किंमतीमुळे एसटीवर संकट आले आहे.
तब्बल दोन हजार तिनशे कोटी रु. संचित तोटा सोसणाऱ्या एसटीला यावर्षी केवळ इंधन दरवाढीमुळे ४६० कोटी रुपयांचा अतिरिक्त भार सहन करावा लागणार आहे. त्यातच एसटीच्या एक लाख कर्मचाऱ्यांची पगारवाढ होऊ घातली आहे. त्याचाही आर्थिक भार एसटीवर पडणार आहे.
गेले सहा महिने सातत्याने डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ होत आहे. पण ऐन गर्दीच्या हंगामात प्रवाशांना तिकीट दरवाढीची झळ बसू नये म्हणून एसटीने आतापर्यंत तिकीट दरवाढ केलेली नाही. यापूर्वी जुलै – ऑगस्ट २०१४ मध्ये एसटीची भाडेवाढ झाली होती. यावेळी मात्र एसटीची भाडेवाढ परिहार्य आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -