घरक्रीडाक्रिकेट खेळायला गेला अन् काळाने केला घात

क्रिकेट खेळायला गेला अन् काळाने केला घात

Subscribe

गेल्या काही वर्षांपासून मैदानी खेळ खेळत असताना खेळाडूंचा अचानक मृत्यू होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अनेक तंदुरूस्त मुल अशा घटनांमध्ये आपला जीव गमवतात.

गेल्या काही वर्षांपासून मैदानी खेळ खेळत असताना खेळाडूंचा अचानक मृत्यू होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अनेक तंदुरूस्त मुल अशा घटनांमध्ये आपला जीव गमवतात. अशातच आणखी एक घटना पुण्यात (Pune) घडली आहे. क्रिकेट (Cricket) खेळायला गेलेल्या तरुण खेळाडूचा मैदानातच मृत्यू झाला. श्रीतेज सचिन घुले असे या तरुणाचे नाव असून तो २२ वर्षांचा होता. (due to heart attack 22 year cricketer died in pune)

पुण्यातील हडपसर (Hadapser) भागामध्ये हांडेवाडी मैदानात (Handewadi Ground) खेळत असताना श्रीतेजला दम लागला आणि यात त्याचा मृत्यू झाला. रविवारी सकाळी ७ वाजता श्रीतेज क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता. हडपसर येथील हांडेवाडी मैदानात मित्रांसोबत क्रिकेट खेळायला सुरूवात केली, पण काही वेळानंतर दम लागल्यामुळे तो मैदानातच कोसळला. त्यावेळी उपस्थित मित्रांनी श्रीतेजला पाणी देऊन शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. परंतु, श्रीतेज कोणताही प्रतिसाद देत नसल्यामुळे तसेच, शुद्धीवर येत नसल्यामुळे मित्रांनी त्याला जवळच्या रुग्णालयात नेले.

- Advertisement -

रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर श्रीतेजची तपासणी केली असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. डॉक्टरांनी श्रीतेजचे निधन झाल्याचे सांगितल्यानंतर त्याच्या मित्रांना मोठा धक्का बसला. शिवाय, तरणाताठ श्रीतेजचा मृत्यू झाला. त्याचा निधनामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

दरम्यान, याआधी अशा बऱ्याच घटना घडल्या आहेत. तर पुण्यातील ही दुसरी घटना असून, पुण्याच्या बोरी बुद्रुकमध्ये जाधववाडी गावात एका क्रिकेटपटूचा खेळत असताना हृदयविकाराच्या झटक्याने एका खेळाडूचा मृत्यू झाला होता. फेब्रुवारी २०२१ मध्ये ही घटना घडली होती.

- Advertisement -

हेही वाचा – इंग्लंडच्या जेम्स अँडरसनने रचला इतिहास, ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला पहिला वेगवान गोलंदाज

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -