पुण्यात ‘मुसळधार’, झाड कोसळून रिक्षा चालकाचा मृत्यू

मुसळधार पावासामुळे पुण्यात झाड कोसळून एका रिक्षा चालकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. पुण्यात पावसाने अचानक जोर धरल्याने अनेक सखल भागात पाणी साचले. शुक्रवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली.

Regional Meteorological Centre Mumbai issues weather warning for the next 5 days for Maharashtra.

मुसळधार पावासामुळे पुण्यात झाड कोसळून एका रिक्षा चालकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. पुण्यात पावसाने अचानक जोर धरल्याने अनेक सखल भागात पाणी साचले. शुक्रवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. राज्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावण्यास सुरूवात केली आहे. मुसळधार पावसाचा पुण्याला चांगलाच फटका बसल्याचे दिसत आहे. (due to heavy rain rickshaw puller died after a tree fell in pune)

पुण्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी झाडे पडली तर रस्त्यावर पाण्याचे लोंढे वाहत आहेत. जोरदार पाऊस झाल्याने पुण्यातील विविध भागांमध्ये झाड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. नाना पेठ, चमडी गल्ली येथे तर मुसळधार पावसाने गाड्या पडल्या असून पावसाचा जोर वाढला तर त्या वाहून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसामध्ये नागरिकांनी एका ठिकाणी थांबावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

रस्ता पेठ कल्याणी नगर, स्वारगेट, बालाजी नगर, धनकवडी, कात्रज, पिंपरी चिंचवड शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचल्यामुळे वाहतुककोंडी निर्माण झाली आहे.

मुसळधार पावसाचा कोल्हापूरलाही मोठा फटका बसल्याचे पाहायला मिळत आहे. जोरदार पावसामुळे कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावर सव्वाशे वर्षाचे वडाचे झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावर सव्वाशे वर्षाचे वडाचे झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.

कोल्हापूरमध्ये झालेल्या वादळी पावसाने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याचे वृत्त आहे. उजळाईवाडी ते शाहू जकात नाका ते टेंबलाई उड्डाण पूल मार्गावर जोरदार वार्‍याने अनेक झाडांच्या फांद्या मोडून पडल्या. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला.


हेही वाचा – ठाणे रेल्वेस्थानकात तांत्रित बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत