ठाण्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अनोखे आंदोलन; पंतप्रधान कार्यालयाला पाठवले अंत्यसंस्काराचे साहित्य

देशातील महागाई प्रचंड वाढली आहे. पण, अच्छे दिनाची भाषा करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यावर उपाययोजना करीत नाहीत.

देशातील महागाई प्रचंड वाढली आहे. पण, अच्छे दिनाची भाषा करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी (prime minister narendra modi) त्यावर उपाययोजना करीत नाहीत. या महागाईमुळे (Inflation) केंद्रातील भाजप सरकारने गोरगरीब जनतेचे सरणच रचले आहे, असा आरोप करीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड ( jitendra awhad maharashtra cabinet minister for housing) आणि शहराध्यक्ष आनंद परांजपे (Anand Paranjpe) यांच्या मार्गदर्शनाखाली पंतप्रधान कार्यालयाला चक्क अंत्यसंस्काराचे साहित्य (funeral material) पाठविले.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (NCP Youth Congress) ठाणे शहराध्यक्ष विक्रम खामकर आणि मा. विरोधी पक्षनेते शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्याकडून मोदी सरकारचा (Modi Government) धिक्कार करणाऱ्या जोरदार घोषणा दिल्या. आंदोलनाच्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी लाकडे, मडके, फुले, कुंकू- अबीर, चटई आदी साहित्याची मांडणी करण्यात आली होती. हे सर्व साहित्य एका गोणीमध्ये बांधून हे साहित्य कुरियरद्वारे पंतप्रधान कार्यालयात पाठविण्यात आले.

हेही वाचा – महागाई विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा

या प्रसंगी विक्रम खामकर यांनी सांगितले की, सामान्य जनता महागाईमुळे मेटाकुटीस आली आहे. गोरगरीब जनतेला काही दिवसात दोनवेळच्या अन्नाची भ्रांत निर्माण होणार आहे. श्रीलंकेत (Sri lanka) जशी स्थिती निर्माण झाली आहे, तशीच स्थिती भारतामध्येही थोड्याफार फरकाने निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकूणच भाजप सरकार गोरगरीबांचे “सरण” रचत आहे. पण, गरीबांसाठी सरण रचणाऱ्या या भाजप सरकारचे सरण आता जनताच रचणार आहे. येत्या २०२४ ला या सरणाला “चूड” लावण्यात येणार आहे. याची जाणीव करून देण्यासाठीच आम्ही हे साहित्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवित आहोत, असे सांगितले.

हेही वाचा – महागाईने मोडला १० वर्षांचा विक्रम; महागाईचा दर 15.08 टक्क्यांवर

या आंदोलनात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रफुल्ल कांबळे, उमेश अगरवाल, अभिषेक पुसाळकर, दिनेश बने,संतोष मोरे, मंगेश तांबे, कुणाल पाटील, वैभव विचारे, दिलीप उपाडे, शकीब दाते, म्हैसर शेख, कुणाल भोईर, स्वप्नील दुदुष्कार, महेश यादव. साई यादव. निमिष वैती, समीर आडकर, प्रसाद कदम. राजेश कदम, संतोष मोरे. विशांत गायकवाड, किरण माने, समीर नेटके. राजा जाधव, अझहर. सचिन जाधव, संदीप येताल, भारत पवार, श्रवण भोसले. श्रीकांत तावडे, गणेश मोरे,विशाल खामकर, आदी सहभागी झाले होते.


हेही वाचा – गुजरातमध्ये केमिकल ट्रक आणि कारला भीषण अपघात, ६ जणांचा आगीत होरपळून मृत्यू