पुणे : यंदा राज्यात अपेक्षित असा पाऊस पडला नाही. यामुळे राज्यभरातील अनेक जिल्ह्यात दुष्काळाची सदृश्य परिस्थिती दिसत आहे. राज्यातील 13 जिल्ह्यांवर दुष्काळाची परिस्थिती ओढावलेली आहे. या 13 जिल्ह्यांतील काही जिल्हे हे रेड झोन समावेश केल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. राज्यातील विशेष करून मराठवाड्यातील काही जिल्ह्यांची परिस्थिती गंभीर आहे.
राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 13 जिल्ह्यातील पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. राज्यातील इतर भाग कोकण, ठाणे, नांदेड या जिल्ह्यात पाऊस सरासरी इतका झाला आहे. तर राज्यातील13 जिल्ह्यात पाऊस सरासरीपेक्षा कमी झाला आहे. यात औरंगाबाद, अहमदनगर, बीड, जालना, धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा, परभणी, हिंगोली, वाशीम, अकोल आणि अमरावती या जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. या जिल्ह्यांचा समावेश रेड झोनमध्ये केल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
हेही वाचा – Justin Trudeau : वडिलांच्या चुकीची ट्रूडोंकडून पुनरावृत्ती! खलिस्तान मुद्द्यावरून भारत-कॅनडाचा वाद शिगेला
पुढील 5 ते 7 दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता
राज्यात जून ते सप्टेंबर महिन्यात पाऊसाचा कालावधी असतो. यात ऑगस्ट आणि जुलै महिन्यात पाऊस सर्वाधिक असतो आणि सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण कमी असते. गेल्या काही वर्षापासून सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण कमी असते. राज्यात पुढील पास ते सात दिवसात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हेही वाचा – पडळकरांच्या वक्तव्यानंतर अजित पवार गट काही शांत होईना; काळं फासणाऱ्याला लाख रुपये देणार
मराठवाड्यातील ‘या’ जिल्ह्यांचा समावेश
मराठवाड्यात सरासरीपेक्षा कमी झाला आहे. यामुळे मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांपैकी 6 जिल्ह्यांचा रेड झोनमध्ये करण्यात आलेला आहे. यात औरंगाबाद, जालना, बीड, धाराशिव, हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यात कमी पाऊस पडला आहे. तसेच नांदेड आणि लातूरमध्ये सरासरी इतका पाऊस झाला आहे.