घरमहाराष्ट्रनाशिकग्रहण कालावधीत आज साईबाबांचे दर्शन बंद

ग्रहण कालावधीत आज साईबाबांचे दर्शन बंद

Subscribe

श्री गुरुपौर्णिमा उत्सवास सुरूवात; श्री साईबाबा समाधी मंदिरातील फुलांच्या सजावटीने भाविकांचे लक्ष वेधले

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था आयोजित केलेल्या श्री गुरुपौर्णिमा उत्सवास सोमवारी (१५ जुलै) उत्साहात सुरुवात झाली. श्री साईबाबा समाधी मंदिर व परिसरात केलेल्या विद्युत रोषणाई व फुलांच्या सजावटीने भाविकांचे लक्ष वेधले. दरम्यान, उत्सवाच्या मुख्य दिवशी (१६ जुलै) चंद्रग्रहण असल्यामुळे श्रींच्या शेजारतीनंतर समाधी मंदिर बंद राहणार आहे.

उत्सवाच्या प्रथम दिवशी पहाटे ५ ला श्रींच्या प्रतिमेची व श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाची मिरवणूक काढली. संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी समाधी मंदिरात श्रींची पाद्यपूजा केली. तसेच, गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील व जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे-पाटील यांनी श्रींच्या समाधीचे दर्शन घेतले. दुपारी मध्यान्ह आरती झाली. सायंकाळी गंगाधरबुवा व्यास, डोंबवली (मुंबई) यांचे कीर्तन झाले. रात्री अश्विनी जोशी यांचा भजन संध्या कार्यक्रम हनुमान मंदिराशेजारील श्री साईबाबा समाधी शताब्दी मंडपातील स्टेजवर झाला. रात्री श्रींच्या पालखीची गावातून मिरवणूक काढण्यात आली. उत्सवाच्या मुख्य दिवशी मंगळवारी (१६ जुलै) चंद्रग्रहण असल्यामुळे श्रींच्या शेजारतीनंतर समाधी मंदिर बंद राहील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -