घरमहाराष्ट्रडॉक्टराच्या निष्काळजीपणा रुग्णाच्या जिवावर बेतला

डॉक्टराच्या निष्काळजीपणा रुग्णाच्या जिवावर बेतला

Subscribe

जळगाव येथे एका डॉक्टराच्या निष्काळजीपणामुळे रुग्णाला इंफेक्शन झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी डॉक्टराला आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहे.

एखादी शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांची दखल घेणे जितके रुग्णाच्या हातात असते तितकेच डॉक्टरांच्या देखील हातात असते. मात्र कधी कधी डॉक्टरांचा हा हलगर्जीपणा रुग्णाला खूप महागात पडतो. अशीच एक घटना जळगाव येथे घडली आहे. जळगाव येथे एका रुग्णाची शस्त्रक्रिया केल्यानंतर मुत्राशय काढताना केलेल्या निष्काळजीपणामुळे रुग्णाला त्याचे इंफेक्शन झाल्याची घटना समोर आली आहे. या निष्काळजीपणा प्रकरणी रुग्णाला नुकसान भरपाई आणि खर्चापोटी तब्बल ३ लाख रुपये देण्याचे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने डॉक्टरला दिले आहेत.

नेमके काय घडले?

विठ्ठल सीताराम पाटील यांना मुतखड्याचा त्रास होत असल्याने ते डॉक्टर अमोल महाजन यांच्या मधूर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेले होते. या हॉस्पिटलमध्ये त्यांची १५ मे २०१७ रोजी शस्त्रक्रिया केली. त्यावेळेस लघुशंकेसाठी मुत्राशयाला बॅग लावली होती. ती बॅग काढण्यासाठी पाटील हे पुन्हा डॉक्टरांकडे गेले. त्यावेळी डॉ. महाजन यांनी ती बॅग काढताना जोरात ओढल्यामुळे रक्त आले. ही बाब पाटील यांनी डॉक्टरांच्या निदर्शनासही आणून दिली. तरी देखील डॉक्टरांनी पाटील यांना घरी पाठवले. रुग्णाचे रक्त येणे न थांबता त्यांना संसर्ग होऊन त्यांची मुत्रनलिका खराब झाली. त्यामुळे त्यांना मुंबई येथे जाऊन गालावरची त्वचा काढून तेथे लावावी लागली. याप्रकरणी पाटील यांनी ग्राहक तक्रार निवारण मंचमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्याबाबत सुनावणी असून ग्राहक मंचचे अध्यक्ष उमेश जावळीकर आणि सदस्य सुरेश जाधव यांनी निकाल दिला आहे. या निकालात डॉ.महाजन यांनी नुकसान भरपाई पोटी २ लाख ७५ हजार आणि तक्रारीच्या खर्चापोटी २५ हजार असे एकूण ३ लाख रुपये तक्रारदारास निकालाची प्रत मिळाल्यापासून तीस दिवसांच्या आत देण्याचे आदेश देण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -