घरताज्या घडामोडीकर्मचाऱ्यांच्या सतर्कमुळे एसटीत कोरोनाचा आकडा 'शून्य'

कर्मचाऱ्यांच्या सतर्कमुळे एसटीत कोरोनाचा आकडा ‘शून्य’

Subscribe

एसटी महामंडळाच्या कर्तव्यांवर असलेल्या एकही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली नसल्याची माहिती समोर येत आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून फिजिकल डिस्टन्सिंग काटेकोर पालन आणि कर्मचाऱ्यांना सतर्कमुळेच हे शक्य झाले आहे अशी, माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे.

देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई दिवसेंदिवस कोरोना विषाणूचे केंद्र बनत चालली आहे. या लॉकडाऊन काळात मुंबईची लोकलसह सर्वच सार्वजनिक वाहतूक बंद आहे. अशा परिस्थितीत अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना ने-आण करण्याकरिता बेस्ट उपक्रमाच्या आणि एसटी महामंडळाच्या बसेस रस्त्यावर धावत आहेत. या लॉकडाऊन काळात आतापर्यंत बेस्टच्या २५० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र, एसटी महामंडळाच्या कर्तव्यांवर असलेल्या एकही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली नसल्याची माहिती समोर येत आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून फिजिकल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन आणि कर्मचाऱ्यांना सतर्कमुळेच हे शक्य झाले आहे अशी, माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे.

एसटीत फिजिकल डिस्टन्सिंग काटेकोर पालन

कोरोना विषाणूच्या वाढत्या फैलावामुळे मुंबईतील परिस्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक गंभीर होत चालली आहे. लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या ने- आण करण्यासाठी बेस्टच्या आणि एसटीच्या विशेष फेऱ्या चालविण्यात येत आहेत. एकीकडे अत्यावश्यक सेवा देणारे सेवेकरी जास्त आणि बेस्टच्या बसेसची संख्या कमी यामुळे बसमध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचा पुरता बेस्टमध्ये फज्जा उडाला आहे. परिणामी बेस्टमध्ये कोरोनाग्रस्त कर्मचाऱ्यांची संख्याही वाढत आहे. तर दुसरीकडे कोरोना संसर्गापासून सुरक्षेसाठी एसटी महामंळाचे फिजिकल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन आणि कर्मचाऱ्यांची सतर्कतेमुळे कोरोनाग्रस्तांची संख्या झिरोवर आली आहे.

- Advertisement -

५० ते ४०० एसटीच्या फेऱ्या चालवल्या जातात

तसेच अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या दळणवळणाची गैरसोय होऊ नये, म्हणून एसटी महामंडळाकडून दररोज ३५० ते ४०० एसटीच्या फेऱ्या चालविण्यात येत आहे. आतापर्यत २३ माचर्पासून २५ मे पर्यंतसुमारे ३८ हजार ७८ फेऱ्याच्या माध्यमातून तब्बल ८ लाख कर्मचाऱ्यांची वाहतुक केली आहे. प्रत्येक दिवशी एसटी महामंडळाच्या या तिन्ही विभागातून २ हजार पेक्षा जास्त कर्मचारी या संकट काळात सेवा देत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी एसटीचा अरनाळ, कुर्ला नेहरूनगर आणि नालासोपारा येथील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. एसटीच्या संतर्कतेमुळे आणि तात्काळ उपचारामुळे हे कर्मचारी कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच अनेक एसटीचे चालक – वाहक डेपोतच मुक्कामी असल्यामुळे सुद्धा सुरक्षित आहेत.

फिजिकल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन

सामाजिक सुरक्षित अंतर राखणे याविषयी एसटी कामगारांमध्ये डेपो डेपोत जनजागृती करण्यात आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांनाच सुरक्षेसाठी कर्मचाऱ्यांना फेसमास्क, सॅनिटायझर, हात मोजे, फेस शिल्ड पुरविण्यात आले आहेत. दररोज प्रत्येक बसमध्ये अनेक वेळा आतून-बाहेरून बसचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. तसेच तिन्ही विभागातील आगर व्यस्थापक सर्व डेपोवर गस्त घालून सुरक्षेच्या आढावा घेताना दिसून येत आहेत. विशेष म्हणजे फिजिकल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन स्वत: च कर्मचारी करत असल्यामुळे एसटीमध्ये कोरोनाचा जास्त शिरकाव होऊ शकला नाही आहे.

- Advertisement -

एसटी महामंडळाकडून कर्मचाऱ्यांची आणि प्रवाशांच्या सुरक्षेची पुरेपूर काळजी घेत आहे. विशेषतः प्रत्येक बसमध्ये आतून-बाहेरून बसचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. तसेच बसेसमध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे निर्देश महामंडळाने दिले आहेत. या निर्देशांचे काटेकोर पालन एसटी कर्मचारी करत आहेत. तसेच कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होऊन नये, यासाठी आमचे पूर्ण प्रयत्न सुरु आहेत.  – शेखर चन्ने, व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ

२३ मार्चपासून आतापर्यंत एसटीच्या फेऱ्या

विभाग फेऱ्या    प्रवासी     संख्या

  • मुंबई विभाग            ९४९४        १,१३६१७
  • ठाणे विभाग             १७,५२६     ४१५६७४
  • पालघर विभाग          ११०५८     २८१६३२

  एकूण                      ३८०७८८  १०,९२३


हेही वाचा – मुंबईपाठोपाठ ठाण्यात प्रवासाच्या बोगस ई-पासेसचं रॅकेट उघड!


Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -