घरताज्या घडामोडीगडचिरोलीत गारांचा गोळीबार, १ गार दोन किलो वजनाची

गडचिरोलीत गारांचा गोळीबार, १ गार दोन किलो वजनाची

Subscribe

गडचिरोलीमध्ये गारांचा पाऊस झाल्यामुळे बीएसएनएलचा मोबाईल टॉवरही कोसळला आहे. तर अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे अंधाराचे स्रामज्य पसरले आहे.

राज्यात दिवसभर कडाक्याचे ऊन असताना आज सायंकाळी बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. अशाच प्रकारचे वादळ गडचिरोलीमध्ये झाले. गोळीबार व्हावा, त्याचप्रमाणे मोठमोठ्या गारा याठिकाणी पडत होत्या. या वादळामुळे याठिकाणचे बीएसएनएल कंपनीचे मोबाईल टॉवर देखील जमिनीवर कोसळले. त्यामुळे गडचिरोली आणि इतर परिसरातील बीएसएनएलची सेवा खंडीत झाली.

दरम्यान, या वादळामुळे अनेक ठिकाणी झाडे पडली असून विद्युत तारा सुद्धा कोसळल्या आहेत. यामुळे अनेक ठिकाणी अंधार झाला आहे. तर बीएसएनएलचा टॉवर कोसळल्यामुळे मोबाईल आणि फोन सेवा बंद झाली आहे. तसेच बऱ्याच जणांच्या घरांचे नुकसान झाले आहे. घरांच्या पत्र्यांवर आणि कवलावर गारा पडून मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे या एका गारीचे वडन तब्बल दोन किलो इतके आहे. त्यामुळे या गारा पडून या परिसरातील लोकांचे मोठे नुकसान झाले आहे.

- Advertisement -

गोळीबार होत नाहीये या गारा पडतायत

Gadchiroli: राज्यात आज बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. गोळीबार व्हावा, त्याप्रमाणे मोठमोठ्या गारा पडत होत्या. वादळ सुटल्यामुळे बीएसएनलचा एक टॉवरही यावेळी जमिनदोस्त झाला.

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಬುಧವಾರ, ಏಪ್ರಿಲ್ 29, 2020


हेही वाचा – ब्राह्मणगावात सिलेंडरचा स्फोट; दोन घरे जळून खाक

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -