Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी प्रकाश आंबेडकरांनी शब्द जपून वापरावेत - संजय राऊत

प्रकाश आंबेडकरांनी शब्द जपून वापरावेत – संजय राऊत

Subscribe

'आजही या देशामध्ये विरोधी पक्षांच्या एकीचा आपण विचार करतो. तेव्हा आपण शरद पवार यांचे नाव प्रामुख्याने घेतो. कारण समस्त विरोधी पक्षांना एकत्र करण्याच काम शरद पवार करू शकतात. त्यामुळे अशा प्रकारच्या भूमिका घेताला प्रकाश आंबेडकर यांनी जपून शब्द वापरावेत', अशा शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी खोचक सल्ला दिला.

‘आजही या देशामध्ये विरोधी पक्षांच्या एकीचा आपण विचार करतो. तेव्हा आपण शरद पवार यांचे नाव प्रामुख्याने घेतो. कारण समस्त विरोधी पक्षांना एकत्र करण्याच काम शरद पवार करू शकतात. त्यामुळे अशा प्रकारच्या भूमिका घेताला प्रकाश आंबेडकर यांनी जपून शब्द वापरावेत’, अशा शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी खोचक सल्ला दिला. (due to statement on ncp chief sharad pawar mp sanjay raut criticizes vanchit prakash ambedkar)

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या विधानाशी आम्ही अजिबात सहमत नाही. प्रकाश आंबेडकर आणि शिवसेनेची चार दिवसांपूर्वीच युती झाली. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात घोषणा केली. परंतु, प्रकाश आंबेडकर यांनी युती केल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या (ठाकरे गट) प्रमुखांबद्दल विधान करणे आम्हाला मान्य नाही”, असे संजय राऊत यांनी म्हटले.

शरद पवरांच्या कारकिर्दीवर आरोप करण्यासारखे – राऊत

- Advertisement -

“विशेषत: शरद पवार हे महाराष्ट्राचे आणि देशाते महत्त्वाचे नेते आहेत. त्यामुळे ते भाजपाचे आहेत असे वक्तव्य करणे म्हणजे, शरद पवरांच्या कारकिर्दीवर आरोप करण्यासारखे आहे. जर शरद पवार भाजपाचे असते तर त्यांनी अडीच वर्षापूर्वी भाजपाचे सरकार दूर ठेवून शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार येऊच दिले नसते”, असेही संजय राऊत म्हणाले.

प्रकाश आंबेडकर यांनी जपून शब्द वापरावेत – राऊत

“शरद पवारांनी प्रत्येकवेळी भाजपाला रोखण्याचा प्रयत्न केला. आजही या देशामध्ये विरोधी पक्षांच्या एकीचा आपण विचार करतो. तेव्हा आपण शरद पवार यांचे नाव प्रामुख्याने घेतो. कारण समस्त विरोधी पक्षांना एकत्र करण्याच काम शरद पवार करू शकतात. त्यामुळे अशा प्रकारच्या भूमिका घेताला प्रकाश आंबेडकर यांनी जपून शब्द वापरावेत”, असा खोचक सल्ला संजय राऊत यांनी दिला.

- Advertisement -

“भविष्यामध्ये आपल्याला महाविकास आघाडीमध्ये काम करायचे आहे, अशी चर्चाही उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात झाली. त्यामुळे भुतकाळातील काही मतभेद असतील ते आपल्याला दूर ठेवावे लागतील आणि आपण भक्कम आघाडी उभी करूया”, असेही संजय राऊत यांनी सांगितले.


हेही वाचा – ‘मविआ’चा भाग व्हायचे असेल तर, प्रमुख स्तंभांवर बोलू नये; राऊतांचा आंबेडकरांना सल्ला

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -