आंबोली घाटातील धोकादायक रस्त्यांमुळे अवजड वाहनांवर बंदी

आंबोली घाटाचे रस्ते जीर्ण झाल्यामुळे तसेच पुलांना भेगा पडल्या असल्यामुळे घाट धोकादायक बनला आहे. त्यामुळे घाटावर अवजड वाहानांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे.

Due to the dilapidation of the Amboli Ghat, the impaired vehicles can be stopped
घाटातील पुल, रस्ते धोकादायक झाल्यामुळे अवजड वाहनांना बंदी

आंबोली घाटातील रस्त्यांची कामे सुरू झाल्यामुळे, तसेच घाटातील वस भागातील पूल धोकादायक बनला असल्यामुळे घाटावर अवजड वाहानांच्या प्रवासावर बंदी घालण्यात आली आहे. जिल्हा प्रशानाने प्रवेश बंदीचे आदेश दिले आहेत. तसेच पुढील आदेश येई पर्यंत आंबोली घाटात अवजड वाहानांना घेऊन जात येणार नाही आहे. हा आदेश गुरूवारी दि. ११ एप्रिल रोजी सावंतवाडी बांधकाम विभागाने काढला आहे. काही काळापूर्वी आंबोली गावातील राहिवासीयांनी आवाज उठवला होता. तसेच त्यांनीही अवजड वाहनांना बंदी घालावि अशी मागणी करण्यात येत होती. तर त्यांनी बांधकाम विभागाला प्रस्ताव तयार करून पाठवले होते. हा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आले होते. तसेच हा पुल जीर्ण झाला आहे. तसेच काही ठिकाणी पूलांना भेगा ही गेल्या आहेत, तर पुल कमकुवत सुद्धा बनला आहे. तसेच त्या प्रस्तावाला बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता युवराज देसाई यांनीही दुजोरा दिला आहे.

कश्यामुळे वाढला ताण

गोवा येथून बेळगाव चोर्ला घाट आणि चंदगडला जोडणारा रामघाट या दोन्ही घाट सुरू नसल्याने सर्व अवजड वाहने आंबोली घाटाकडे वळवण्यात आल्या असल्यामुळे मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आणि पूलांवर ताण वाढले आहे. अवजड वाहन्यांमुळे आंबोली घाट जीर्ण झाले आहे. यासर्व गोष्टींचा विचार करून आंबोली घाटात अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आले आहे.

तातडीने अंमलबजावणी

बांधकाम विभागाने पोलिसांना दिलेल्या माहिती नुसार, या प्रवेश बंदीमध्ये २० टन वरच्या वाहनांना ही बंदी घालण्यात आली आहे. मोठ्या लॉरी तसेच अन्य वाहनांना परवागी नाकारण्यात आली आहे. तसेच खडी, वाळू तसेच चिरे वाहून नेणारे डंपर, एसटी बस, एसटीच्या शिवशाही बस या सर्वांना मुभा दिली आहे. याची आदेशांची अंबलबजावणी काल दि.११ एप्रिल पासून करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाला अवजड वाहानांना बंदी घालण्याबाबत प्रस्ताव मांडला होता. त्यासंबंधीत सभाव्य धोका लक्षात घेऊन त्याकडे तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत, तर पुढी अंमलबजावणी केली जाणार असल्याचे बांधकाम विभागाते कार्यकारी अभियंता युवराज देसाई यांनी सांगितले आहे.