Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र सलग चार दिवसांच्या सुट्टीमुळे तीर्थस्थळ आणि पर्यटनस्थळांवर मोठी गर्दी

सलग चार दिवसांच्या सुट्टीमुळे तीर्थस्थळ आणि पर्यटनस्थळांवर मोठी गर्दी

Subscribe

मुंबई : स्वातंत्र्य दिनानिमित्ताने सलग चार दिवस सुट्ट्या आल्याने तीर्थस्थळ आणि पर्यटनस्थळे गजबजली आहेत. या सुट्ट्यामुळे मुंबईतून बाहेर जाणाऱ्या मार्गावर मोठी गर्दी झाली आहे. यात मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. तसेच मुंबई-गोवा महामार्गावर ही वाहनांच्या सहा किमीपर्यंत रांगाल लागल्या आहेत.

आज सकाळी शिर्डीत काकड आरतीनंतर दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी दिसून आली. त्याचबरोबर बुलढाण्यातील शेगाव येथे संत गजानन महाराज समाधी स्थळ आणि मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होती. शिर्डींत साई भक्तांचे दर्शन सुकर होण्यासाठी साई संस्थांनी जय्यत तयारी केली असून या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. आज पहाटे मंदिरबाहेर 300 मीटपर्यंत रांगा लागल्याचे चित्र दिसून आले.

- Advertisement -

हेही वाचा – कोकणवासीयांसाठी खुशखबर! गणेशोत्सवासाठी पश्चिम रेल्वेवर विशेष गाड्या धावणार

‘या’ ठिकाणचे हॉटेल-फार्महाऊस बुकिंग

जुलै महिन्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर डोंगर हिरवळीने नटले आहेत आणि डोंगररांगांच्या कुशीत वसलेले माळशेज, कर्जत, माथेरान आणि मुरबाड फार्महाऊस गर्दी झाली आहे. तसेच लहान-मोठी हॉटेल पुढील आठवड्यांपर्यंत बुकिंग करण्यात आलेली आहे.

- Advertisement -

- Advertisment -