घर महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांनी 'या' कारणामुळे फाइव्ह स्टार हॉटेलमधील मुक्काम शासकीय विश्रामगृहात हलवला

मुख्यमंत्र्यांनी ‘या’ कारणामुळे फाइव्ह स्टार हॉटेलमधील मुक्काम शासकीय विश्रामगृहात हलवला

Subscribe

औरंगाबाद : मराठवाड्यात आज मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. जवळपास सात वर्षानंतर मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत मराठवाड्यासाठी 40 हजार कोटीचे पॅकेज जाहीर करण्यात येण्याची शक्यता वर्तवली जाते. या बैठकीसाठी कॅबिनेटमधील अनेक मंत्री मराठवाड्यात आले असून या मंत्र्यांसाठी फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये राहण्याच्या बातम्या शुक्रवारीपर्यंत येत होत्या. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फाइव्ह स्टार हॉटेलमधील मुक्काम हा शासकीय विश्रामगृहात हलवला आहे. मुख्यमंत्री हे औरंगाबादच्या रामा हॉटलेमधली आलिशान सूटमध्ये राहणार होते. पण राज्यातील दुष्काळाच्या परिस्थिती लक्षत घेता. मुख्यमंत्र्यांनी फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये राहणे टाळल्याची माहिती माध्यमातून मिळाली आहे.

मराठवाड्यात मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण मंत्रिमंडळ आले आहे. मुख्यमंत्र्यांसाठी रामा या फाइव्ह स्टार हॉटेल सूट बुक करण्यात आला होता. यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सर्व मंत्र्यांच्या राहण्याची सोय करण्यात आली होती. या हटेलच्या एका दिवसांचे भाडे 32 हजार रुपये आहे. तसेत मुख्यमंत्र्याचे आणि इतर मंत्र्यांच्या सर्व सचिवांची सोय ही ताज हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. सचिवांसाठी 40 रूम बुक केल्या आहेत. तर अमरप्रित हॉटेलमध्ये 70 रुप बुक केले आहेत. या बैठकीसाठी नम्रता कॅटर्सला जेवणाचे कंत्राट देण्यात आले आहे. यात एका थाळींची किमत 1 हजार रुपये आहे. मंत्रिमंडळा बैठकीसाठी जवळपास 300 गाड्या बुक करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – राज्य मंत्रिमंडळाची आज मराठवाड्यात बैठक; 40 हजार कोटींचे पॅकेज?

राज्य सरकारवर विरोधकांची टीका

मराठवाडा हा भाग दुष्काळी आहे. यंदा राज्यात पुरेसा पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. एका बाजूला शेतकरी संकटात असताना बैठकीसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. यावरून विरोधकांनी राज्य सरकावर सडकून टीका केली. यामुळे मुख्यमंत्र्यांनी फाइव्ह स्टारमधील मुक्काम हलवून शासकीय विश्रामगृहात हलवला. यापूर्वी मराठवाड्यात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत तत्कालीन मुख्यमंत्री विकासराव देशमुख, मनोहर जोशी, अशोक चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांनी शासनाच्या विश्रामगृहात राहणे पसंत केले होते.

- Advertisement -

- Advertisment -