सततच्या पावसामुळे मुंबईच्या पाणीसाठ्यात १०.९० टक्क्यांपर्यंत वाढ

मुंबई व परिसरात बुधवारी रात्रीपासून चांगला पाऊस पडत आहे. अगदी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात तलाव क्षेत्रातही गेल्या ४८ तासांत चांगला पाऊस पडला आहे.

Good news for Mumbaikars Increased water storage due light rain falling in lake area

मुंबई व परिसरात बुधवारी रात्रीपासून चांगला पाऊस पडत आहे. अगदी मुंबईला पाणी पुरवठा (Water Supply) करणाऱ्या सात तलाव क्षेत्रातही गेल्या ४८ तासांत चांगला पाऊस पडला आहे. त्यामुळे पाणी साठ्यात १०,७६७ दशलक्ष लिटरने वाढ झाल्याची माहिती समोर येत आहे. (due to two days of rains increase mumbai water by 10 90 percent)

मुंबईला पाणीपुरवठा (Mumbai Rainfall) करणाऱ्या सात तलावात गेल्या ९ जूनपासून पाऊस सुरू झाल्यासपासून अपेक्षित पाऊस पडलेला नाही. त्यामुळे पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांतील पाणीसाठा हळूहळू तळ गाठू लागला आहे. परिणामी पालिका पाणी खात्याने २७ जूनपासून मुंबईला होणाऱ्या दैनंदिन पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात लागू केली असून त्याची अंमलबजावणी सुरू आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत मुबलक पाणीसाठा असल्यास पालिका नियमितपणे ३,८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करते. मात्र सध्या १० टक्के पाणी कपात लागू केल्याने मुंबईला दररोज ३,४६५ दशलक्ष लिटर इतक्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतो.

मात्र बुधवारी रात्रीपासून चांगला पाऊस तलाव क्षेत्रात पडल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाणीसाठ्यात तब्बल १०,७६७ दशलक्ष लिटर पाणीसाठ्याची वाढ झाली आहे. कारण की, बुधवारी म्हणजे २९ जून रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांत एकूण १,४७,००६ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा होता.

२९ जून रोजी रात्रीपासून तलावांत चांगला पाऊस पडल्याने या पाणीसाठ्यात ५,१४७ दशलक्ष लिटरने वाढ झाल्याचे ३० जून रोजीच्या तलावांतील पाणीसाठयाबाबतच्या तक्त्यात नमूद करण्यात आले आहे. तर ३० जून रोजीही तलाव क्षेत्रात चांगला पाऊस पडल्याने सदर तलावातील पाणीसाठ्यात आणखीन ५,६२० दशलक्ष लिटरने वाढ झाली.

परिणामी गेल्या दोन दिवसांत तलाव क्षेत्रात चांगला पाऊस पडल्याने तलावातील पाणी साठ्यात १०,७६७ दशलक्ष लिटरने वाढ झाली आहे. मुंबईत सध्या १० टक्के पाणीकपात लागू असल्याने दररोज ३,४६५ दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यामुळे दररोज होणाऱ्या पाणीपुरवठयाचे परिमाण लक्षात घेता तलावात किमान तीन दिवसांच्या पाणीसाठ्याची वाढ झाल्याची माहिती समोर येते.

९ जूनपासून आजपर्यंत सात तलावातील पाऊस व पाणीसाठा

तलाव                 तलावांत पडलेला पाऊस (मिमी)              पाणीसाठा दशलक्ष लि.

उच्च वैतरणा                     १६८.००                                       ०

मोडकसागर                     २१४.००                                    ४५,८१८

तानसा                           ३२६ .००                                   १०,१९३

मध्य वैतरणा                    २५७ .००                                   १६,९००

भातसा                          ३९८. ००                                    ७८,१८०

विहार                           ४८४ .००                                   ४,६७७

तुळशी                          ५८४.००                                    २,००६

एकूण                           २,४३१ . ००                              १,५७,७७३

 


हेही वाचा – दक्षिण मुंबईतील पेडर रोड येथे भुस्खलन; मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग