घरताज्या घडामोडीहापूस इलो रे....पण अवकाळी पावसामुळे होतोय हापूसच्या चाहत्यांचा हिरमोड

हापूस इलो रे….पण अवकाळी पावसामुळे होतोय हापूसच्या चाहत्यांचा हिरमोड

Subscribe

नैसर्गिक बदलांमुळे आंबा बागायतदारांच्या व्यवसायावर परिणाम होत आहेत.

कोकणचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हापूस आंब्याच्या आगमनाची ओढ सर्वच हापूस प्रेमींना असते. मात्र यंदा कोरोनाचा प्रादूर्भाव कमी असून देखील, हापूस विक्रीवर अवकाळी पावसाचा फटका बसणार आहे.त्यामुळे यंदाही अवकाळी पावसामुळे हापूस चाहत्यांचा हिरमोड होणार आहे. नोव्हेंबरची १५ तारीख उलटून गेली तरी थंडीच्या मोसमास अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. राज्यातील इतर भागासह कोकणातही अनेक ठिकाणी पावसाची मुसळधार सुरु आहे. परिणामी कोकणचा राजा म्हणजे हापूसच्या बागायतदारांना याचा मोठा फटका बसला आहे. कारण नोव्हेंबर महिन्यात पडणारी थंडी ही हापूससाठी पोषक असल्याचे समजले जाते. हा काळ हापूसच्या मोहोर प्रक्रियेचा काळ असून, पावसामुळे हापूसच्या आगमनासाठी चाहत्यांना ताटकळत रहावे लागणार असल्याची शक्यता आंबा बागायतदारांकडून व्यक्त केली जात आहे.

अवकाळी पावसामुळे बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन आंबा बागायतदारांचे गणितही चुकले आहे. कारण अनेक बागायतदारांनी आंब्याच्या झाडांना पहिली आणि दूसरी फवारणी केली असून फवारणीसाठी ८ ते १० लाख इतका खर्च येत असतो.मात्र अवकाळी पावसामुळे ही केलली फवारणी वाया गेली आहे.याशिवाय झाडांना रोगांचा सामना करावा लागणार आहे. नोव्हेंबरच्या हापूससाठी असणाऱ्या पोषक वातावरणात मोहोर प्रक्रियेत अडथळा निर्माण होणार आहे. या नैसर्गिक बदलांमुळे आंबा बागायतदारांच्या व्यवसायावर परिणाम होत आहेत.याशिवाय वाढता खर्च, त्यानंतर मिळणारं उत्पन्न यामुळे आंबा बागायतदारांची आर्थिक घडी विस्कटली आहे.

- Advertisement -

मार्च महिना सुरू झाल्यानंतर हापूसच्या आगमनाची आणि त्याची चव चाखण्यासाठी हापूसचे चाहते आतुरतेने हापूसच्या पेट्यांची वाट पाहत असतात.मात्र वारंवार येणारी वादळे,अवकाळी पाऊस आणि जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनामुळे आंबा बागायतदारांच्या व्यवहाराला मोठा फटका बसला आहे.


हे ही वाचा – जातीयवाचक गल्ल्यांना आता मिळणार नवीन नावे

- Advertisement -

 

 

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -