घरमहाराष्ट्रआचारसंहितेच्या कालावधीत १२३ कोटींचा मुद्देमाल जप्त; २२ हजार गुन्हे दाखल

आचारसंहितेच्या कालावधीत १२३ कोटींचा मुद्देमाल जप्त; २२ हजार गुन्हे दाखल

Subscribe

राज्यात आचारसंहिता कालावधीत पोलीस, आयकर विभाग आणि अबकारी कर या विभागांनी केलेल्या कारवाईत आतापर्यंत १२३ कोटींचा मुद्देमाल जप्त करण्याता आला असून २२ हजार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

राज्यात आचारसंहिता कालावधीत पोलीस, आयकर विभाग आणि अबकारी कर विभाग आदी विभागांकडून काटेकोर कार्यवाही सुरू आहे. या विभागांनी केलेल्या कारवाईत आतापर्यंत रोख रक्कम, दारु, मादक पदार्थ, सोने – चांदी आदी स्वरुपात १२३ कोटी ७५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून २२ हजार गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली आहे.

या गोष्टींचा यात समावेश

पोलीस, आयकर विभाग, अबकारी कर विभाग आदी विभागांकडून केलेल्या कारवाईमध्ये १२३ कोटी ७५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये ४६ कोटी ६२ लाख रुपये रोकड, २३ कोटी ९६ लाख रुपये किमतीची ३ कोटी ८ लाख ७९३ लिटर दारु, ७ कोटी ६१ लाख रुपयांचे मादक पदार्थ, ४५ कोटी ४७ लाख रुपयांचे सोने, चांदी यांचा समावेश आहे.

- Advertisement -

२२ हजार गुन्हे दाखल

राज्यात आचारसंहिता भंग आणि निवडणूक प्रक्रियेशी निगडीत इतर स्वरुपाचे २२ हजार ७९५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये पोलीस विभाग आणि उत्पादन शुल्क विभागाकडून दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांचा समावेश आहे. भारतीय दंड संहितेच्या विविध कालमांतर्गत ४१६ गुन्हे, लोकप्रतिनिधित्व अधिनियमांतर्गत ७६ गुन्हे, अनधिकृतरित्या दारू बाळगणे, विक्री, वाटपासाठी दारूची वाहतूक अशा स्वरुपाचे १४ हजार ५८३ गुन्हे, बेकायदेशीररित्या शस्त्र निर्मिती, विक्री, त्याचे प्रदर्शन, शस्त्र जवळ बाळगणे आदींबाबत ७४७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नशेचे पदार्थ (नारकोटिक्स ड्रग्ज) बाळगल्याबाबतचे १२६, स्फोटक पदार्थ कायद्यांतर्गत १२ गुन्हे, अन्न व औषध अधिनियमांतर्गत ६०, महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत मालमत्तेचे विद्रुपीकरण अंतर्गत ६६ आणि इतर २८ गुन्ह्यांचा समावेश आहे.

आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत शस्त्र परवानाधारकाकडून ४० हजार ३३७ शस्त्रे जमा करून घेण्यात आली आहेत. सूचना देऊनही जमा न केलेली ३० शस्त्रे जप्त करण्यात आली असून १३५ शस्त्र परवाने रद्द करण्यात आले आहेत. याशिवाय १ हजार ५७१ विनापरवाना शस्त्रे, ५६६ काडतुसे आणि १८ हजार ५१३ जिलेटीन आदी स्वरूपाचे स्फोटक पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

- Advertisement -

‘सी-व्हिजिल’ ॲपवर ३ हजार ५६१ तक्रारी

‘सी-व्हिजिल’ ॲपवर आतापर्यंत ३ हजार ५६१ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी २ हजार ३४ तक्रारींमध्ये तथ्य आढळून आले असून त्यामध्ये जिल्हा स्तरावर योग्य ती कार्यवाही करण्यात आली आहे. या ॲपवर अनधिकृत दारू, मतदारांना आमिष म्हणून दारुचे वाटप, पैशाचा वापर, विनापरवानगी पोस्टर लावणे, मालमत्तेचे विद्रुपीकरण आदी स्वरुपाच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -