घरमहाराष्ट्रकोल्हापूर जिल्हा बँकेच्या चौकशीदरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना घेतलं ताब्यात

कोल्हापूर जिल्हा बँकेच्या चौकशीदरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना घेतलं ताब्यात

Subscribe

कोल्हापूर – कोल्हापूर जिल्हा बँकेची ईडीकडून कालपासून तपासणी सुरू आहे. या बँकेच्या अध्यक्षपदी हसन मुश्रीफ आहेत. या चौकशीदरम्यान पाच कर्मचाऱ्यांना ईडीने ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे ईडीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करू असा इशारा कर्मचारी संघटनांनी दिला आहे.

गेल्या तीस तासांपासून कोल्हापूर जिल्हा बँकेची ईडीकडून तपासणी सुरू आहे. ईडीचे अधिकारी बँकेतून कागदपत्रे घेऊन गेले आहेत. तर, ताब्यात घेतलेल्या कर्मचाऱ्यांना मुंबईला घेऊन गेले आहेत. त्यामुळे ते प्रचंड तणावाखाली असल्याचं सांगितलं जातंय. कर्मचाऱ्यांनी ईडीच्या चौकशीला विरोध केलेला नाही. परंतु, कर्मचाऱ्यांच्या चौकशीसाठी त्यांना थांबवून ठेवणं चुकीचं आहे, अशी भूमिका कर्मचारी संघटनांनी मांडली आहे. बँक सुटायच्या वेळेला त्यांनी कर्मचाऱ्यांना सोडून दिलं तर, उद्या नऊ वाजता ते सांगतील त्या ठिकाणी चौकशीसाठी हजर राहतील, असंही सांगण्यात आलं आहे. मानवतावादी दृष्टीकोनातून या कर्मचाऱ्यांना विश्रांतीसाठी घरी जायला परवानगी द्या, अशी आम्ही मागणी केली. पण ईडीनं आमची मागणी धुडकावून लावल्याचं या कर्मचाऱ्यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा – राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफांच्या घरी ईडीची 12 तास चौकशी

दरम्यान, या कर्मचाऱ्यांविरोधात समन्स आले आहे. त्यामुळे त्यांना चौकशीसाठी यावं लागेल, असं ईडीच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. परंतु, कर्मचारी तणावाखाली असल्याने त्यांना विश्रांतीसाठी घरी सोडण्यात यावं, असं कर्मचारी संघटनांनी म्हटलं आहे. या कर्मचाऱ्यांना कोणताही धोका झाला तर संबंधित अधिकाऱ्यांवर खटले दाखल करू, असा इशाराही देण्यात आला आहे.

- Advertisement -

हसन मुश्रीफांच्या घरी छापे

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर ११ जानेवारी रोजी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) धाड टाकली होती. हसन मुश्रीफांच्या कागल आणि पुण्यातील घरांवर ईडीने छापे टाकले. तब्बल 12 तास त्यांची चौकशी करण्यात आली. तसेच, या चौकशीवेळी अधिकाऱ्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तर दिल्याची माहिती हसन मुश्रीफ यांचा मुलगा नाविद मुश्रीफ याने दिली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -