एकनाथ शिंदेंसोबतचा धर्मवीर चित्रपटाचा पडद्यामागील ‘तो’ किस्सा, मंगेश देसाई म्हणाले…

'धर्मवीर' चित्रपटाच्या प्रमोशन वेळी निर्माते मंगेश देसाई यांनी या चित्रपटावेळी पडद्यामागे घडलेले अनेक किस्से आणि आठवणी शेअर केल्या होत्या.

ठाण्याचा ढाण्या वाघ अशी ओळख असलेले आनंद दिघे(anand dighe) त्यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर- मुक्काम पोस्ट ठाणे'(dharmaveer- mukkam post thane) हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. प्रेक्षकांनी या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद दिला. ‘धर्मवीर’ चित्रपटाच्या निर्मितीची धुरा सांभाळलेले अभिनेते मंगेश देसाई(mangesh desai) यांचा आज वाढदिवस आहे. मंगेश देसाई त्यांच्या वयाच्या पन्नाशीत पदार्पण करत आहेत. मंगेश देसाई मराठी सिनेसृष्टीप्रमाणे हिंदीतही काम करत आहेत. ‘धर्मवीर’ चित्रपट प्रदर्शित झाल्यापासूनच किंबहुना प्रदर्शित होण्यापूर्वीच मंगेश देसाई या चित्रपटामुळे चर्चेत आले होते. ‘धर्मवीर’ चित्रपटाच्या प्रमोशन वेळी निर्माते मंगेश देसाई यांनी या चित्रपटावेळी पडद्यामागे घडलेले अनेक किस्से आणि आठवणी शेअर केल्या होत्या. मंगेश देसाई यांनी एकनाथ शिंदे यांच्या सोबतचा सुद्धा एक किस्सा शेअर केला होता.

 

आणखी वाचा –  “हा शरद पोंक्षे तूच ना?” पोंक्षेंचा जुना व्हिडीओ शेअर करत आदेश बांदेकरांनी…

मंगेश देसाई एके ठिकाणी मुलाखत देत असताना म्हणाले, की ” आनंद दिघे(anand dighe) यांच्या जीवनावर चित्रपट करू असं गेली अनेक वर्ष माझ्या डोक्यात होतं, पण त्याला हवा तास मुहूर्त मिळत नव्हता. २०१३ मध्ये मला आणि माझ्या जळवळच्या अनेक मंडळींना असा वाटलं, की दिघे साहेबांवर आधारित चित्रपट करूया. त्यावर २०१४, २०१७ आणि २०१९ अशी तीन वर्ष काम करण्याचा प्रयत्न झाला, पण तो प्रयत्न योग्य होत नव्हता. जो योगायोगाने प्रवीण तरडे यांच्या सोबत यांच्याशी झालेल्या एका छोट्याच्या बोलण्यातून जमून आला आणि प्रवीण तरडे यांनी सुद्धा शंभर टक्के काम करायचं आश्वासन दिलं.” असं मंगेश देसाई(mangesh desai) म्हणाले.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Mangesh Desai (@mangeshdesaiofficial)

आणखी वाचा – त्यांनी संपर्कात असलेल्या आमदारांची नावे जाहीर करावीत, एकनाथ शिंदेंचं शिवसेनेला आव्हान

 

पुढे मंगेश देसाई म्हणाले, ”आनंद दिघे(anand dighe) यांच्या जीवनावर आधारित चित्रपट करायचा याचा आमच्या कडे शंभर टक्के आत्मविश्वास होता पण शंभर टक्के माहिती उपलबध नव्हती. त्यामुळे आनंद दिघे यांच्या सोबत त्यांची सावली म्हणून राहिलेले एकनाथ शिंदे(eknath shinde) यांची मी भेट घेतली. आणि त्यांच्या कडून माहिती घेतली. एकनाथ शिंदे सुद्धा अनेकदा या चित्रपटाविषयी विचारणा करायचे त्यांनी मला सांगितले की तुला विश्वास आहे ना मग तू बिनधास्त पुढे जा आणि कामाला लाग. तुला जी मदत लागेल ती हवी ती मदत मी करायला तयार आहे. पुढे मंगेश देसाई असंही म्हणले की एकनाथ शिंदे आणि माझे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्याचप्रमाणे या संदर्भात मला संपूर्ण माहिती द्या असंही मंगेश देसाई एकनाथ शिंदे यांना म्हणाले. त्यावर एकनाथ शिंदे(eknath shinde) म्हणाले की तू या चित्रपटाचा निर्माता हो. मी निर्मिती करत असताना एकनाथ शिंदे यांनी माझ्या पाठीशी उभं राहत मला भक्कमपाणे साथ दिली. ज्याप्रमाणे आनंद दिघे अनेकांना त्यांच्या अडचणीत मदत करायचे त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे सुद्धा अनेकांच्या अडचणी सोडविण्यासाठी नेहमी मदत करतात.”

आणखी वाचा – उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना दोनदा फोन, भाजप श्रेष्ठींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न, शिवसेनेचा इन्कार

 

‘धर्मवीर- मुक्काम पोस्ट ठाणे'(dharmaveer- mukkam post thane) या चित्रपटात आनंद दिघे यांची मुख्य भूमिका अभिनेते प्रसाद ओक(prasad oak) यांनी साकारली आहे तर या चित्रपटाला दिग्दर्शन तर प्रवीण तरडे यांनी केलं आहे.