घरमहाराष्ट्रमंत्रिपद भाड्यावर टाकून फिरतायत; भगवानगडावरुन पंकजा मुंडेंची तोफ धनंजय मुंडेवर धडाडली

मंत्रिपद भाड्यावर टाकून फिरतायत; भगवानगडावरुन पंकजा मुंडेंची तोफ धनंजय मुंडेवर धडाडली

Subscribe

दसऱ्याच्या निमित्ताने भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांची भगवानगडावरुन तोफ धडाडली. पंकजा मुंडे यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. मंत्रिपद भाड्यावर टाकून फिरतायत, अशी घणाघाती टीका पंकजा मुंडे यांनी केली आहे. तुम्ही चागंलं, जनतेच्या हिताचं काम करा आम्ही जाहीरपणे तुमचे अभिनंदन करु. पण आज राज्यात काय परिस्थिती आहे. स्त्रियांचे प्रश्न वाढलेत, रोज पेपर उघडला, टीव्ही लावली की बलात्काराच्या घटना दिसतात. काय चालंलय महाराष्ट्रात? महिलांवर अत्याचार होत असतात त्यावर जबाब विचारायचा नाही का? असा संतप्त सवाल पंकजा मुंडे यांनी केला.

तुम मुझे कब तक रोकोगे…

पंकजा मुंडे यांनी शेरोशायरी करत विरोधकांना इशारा दिला आहे. तुम मुझे कब तक रोकोगे, मुठ्ठी में कुछ सपने लेकर जेबो में आशाए, दिल में अरमान यहीं कुछ करजाए, सुरज सा तेज नहीं मुझ में, दिपकसा जलता देखोगे, तुम मुझे कब तक रोकोगे, अपनी हद रोशन करने से, तुम मुझे कैसे रोकोगे, कैसे टोकोगे, अशी शेरो शायरी पंकजा मुंडे यांनी केली.

- Advertisement -

हा मेळावा होईल का नाही चर्चा होती. मेळावा नको बोलले कारण सत्ता नाही. कधी या मेळाव्याने सत्ता पाहिली का, असा सवाल पंकजा मुंडे यांनी उपस्थित समर्थकांना केला. मुंडे साहेब सत्तेत नसताना या मेळाव्याने लाखोची संख्या पाहिली, पण कशे राजासारखे राहिलात. आपली परंपरा आहे. कुणी म्हणे अतिवृष्टी आहे कुणी म्हणे कोरोना आहे, लोकांची मनस्थिती नाही. मी म्हटलं अशाच लोकांना ऊर्जा देण्यासाठी मला हा मेळावा घ्यायचा आहे. अधिकाऱ्यांनी विचारलं की लोक येणार, मी म्हटलं मला माहित नाही पण मी जाणार. एवढ्या संख्येने तुम्ही इथे आलात, मला असं वाटतंय की माझ्यासमोर भगवान श्रीकृष्ण साक्षात आहेत, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

आपण जिथे जन्म घेतला त्या मातीचा, जातीचा आपल्याला कधी कमीपणा नाही वाटला पाहिजे अशी गोपीनाथ मुंडेंची शिकवण आहे. राजघराणं असो किंवा वंचितांमध्ये जन्म झालेला असो लाज वाटली नाही पाहिजे. आज महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे त्यासाठी ही परंपरा उभी केली आहे. कोणत्या पक्षाचं, मतांचं राजकारण नाही, तर सामान्यांची चळवळ येथून उठत आहे, जी राज्याच्या कानाकोपऱ्यात जाते, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

- Advertisement -

पंकजाताई घरात बसलेत म्हणून खूश झालेल्यांनी…

पंकजाताई घरात बसलेत म्हणून खूश झालेल्यांनी माझा दौरा लिहून घ्या. मी दिल्ली, नवी मुंबई, नाशिकच्या दौऱ्यावर असणार आहे. ऊसाच्या फडात जाऊन संवाद साधणार आहे. लोकांना कोरोनामध्ये बेड, औषधं मिळत नव्हती. त्यावेळी मी दौरे करायला हवे होते का? तुमची काळजी वाटली म्हणून दौरे नाही केले. पण घरात बसून नव्हते…कोविड सेंटर सुरु केले होते. घरोघरी आम्ही डबे पोहोचवले, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -